विशेष प्रतिनिधी
मुंबई : फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळली असून काँग्रेसने यावर सरकारला थेट लक्ष्य केले आहे. युवक काँग्रेसने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा केली. Dr. Sampada
या आंदोलनाचे नेतृत्व खासदार वर्षा गायकवाड करणार असून, मुंबई युवक काँग्रेस, मुंबई प्रदेश काँग्रेस तसेच सर्व विभागीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंदोलनाची सुरुवात सोमवारी दुपारी १२ वाजता गिरगाव चौपाटीवरून होणार असून तेथून ‘वर्षा’ बंगल्याकडे मोर्चा काढण्यात येईल. Dr. Sampada
काँग्रेसने या प्रकरणात फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या नव्हे, तर ती संस्थात्मक हत्या आहे. बीड जिल्ह्यातील एका सर्वसामान्य दलित कुटुंबातील मुलीने डॉक्टर होऊन समाजात स्थान निर्माण केले, पण सत्ताधारी नेते आणि पोलिसांकडून झालेल्या छळामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागले.”
काँग्रेसच्या मते, या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि स्थानिक पोलिस यांचा थेट छळ आणि दडपशाहीचा सहभाग आहे. “ही केवळ आत्महत्या नसून सत्ता आणि व्यवस्थेने घडवलेला खून आहे,” असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या भेटीत संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांना भेटून न्याय मिळवून देण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. राहुल गांधींनी सांगितले की, “डॉ. संपदाला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस शांत बसणार नाही.”
यावर बोलताना प्रवक्ते राजहंस म्हणाले,“दलित आणि महिला सुरक्षिततेच्या बाबतीत फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात दलित महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, आणि संपदा मुंडे हे त्याचे भीषण उदाहरण आहे. आम्ही या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढा देणार.”
काँग्रेसने या प्रकरणात खालील मागण्या केल्या आहेत: डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. चौकशीदरम्यान संपदाच्या कुटुंबाला सुरक्षा आणि न्याय सहाय्यता निधी देण्यात यावा.
काँग्रेसने आरोप केला की, “सरकार चौकशीच्या नावाखाली गुन्हेगारांना संरक्षण देत आहे. व्यवस्थेने संपदाचा बळी घेतला आहे, आणि सरकार त्यांच्या हत्यारधाऱ्यांना वाचवत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि राज्य सरकारला हादरवून सोडेल.”
या आंदोलनात युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महिला काँग्रेस, मुंबई प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.
Congress Goes on Offensive Over Dr. Sampada Munde Suicide Case; To Gherao CM Fadnavis’ ‘Varsha’ Residence
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















