विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्यातील आगामी काळात घडणाऱ्या राजकारणाचे संकेत नाशिकमध्ये मिळाले आहेत. नाशिकमध्ये मात्र स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत एकत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली. MVA and MNS
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत काही ठिकाणी मैत्रीभाव दिसतोय, तर काही ठिकाणी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यात आता नाशिकमध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येत आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचे जाहीर केले आहे. वरिष्ठ स्तरावर काँग्रेसकडून मनसे युतीबाबत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असतानाही, नाशिकमध्ये मनसे आणि काँग्रेस एकत्र पत्रकार परिषद घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
माकपचे नेते डॉ. डी. एल. कराड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही सर्वांनी आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे थैमान आहे. जाती जातीत भांडण लावण हेच काम सरकारकडून होत आहे. महाराष्ट्रात येत्या निवडणुकांमध्ये महायुतीचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
ते पुढे म्हणाले, आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सगळी सत्ता आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर हजारो घरांना बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करणार. मतदार यांद्यांमध्ये प्रचंड दोष आहेत. याद्या दुरुस्त झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मतदान पत्रिकेवर मतदान झाले पाहिजेल अशी आमची मागणी आहे.
मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी या संयुक्त आघाडीच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, “आज संयुक्त बैठक आयोजित करण्यामागे लोकशाही जिवंत ठेवणे हा उद्देश आहे. देशात मत चोरीवर सरकार आल्याचे राहुल गांधी यांनी निदर्शनास आणले आहे. 96 लाख दुबार मतदार असल्याचा मुद्दा आहे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेनेही मतदार यादीतील घोळ मान्य केला आहे. जनतेला न्याय मिळाला पाहिजे. ओला दुष्काळ, कर्जमाफी यासाठी आम्ही लढतो आहोत.”
दिनकर पाटील पुढे म्हणाले, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आम्ही नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधात आम्ही मोर्चा काढला. नाशिक गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आम्ही मोर्चा काढला. आधी दादा भुसे पोलिस आयुक्तांना भेटले, नंतर सगळे आमदार भेटले. आमच्या मोर्चाचा धसका घेतल्याने नाशिक गुन्हेगारी मुक्त झाले आहे.
नाशिकमधील विरोधकांच्या वज्रमुळीमुळे भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, नाशिक महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Official Alliance Announced Between MVA and MNS in Nashik
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















