विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jaykumar Goreराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकारण तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. एक्स (ट्विटर) वरून केलेल्या पोस्टमुळे दोघांमधील शाब्दिक युद्ध आणखी चिघळले आहे.Jaykumar Gore
रोहित पवार यांनी गोरे यांना थेट खुलं आव्हान देत म्हटलं आहे,“जयकुमार गोरेजी, तुम्ही आधीच ‘उघडे’ पडले आहात, त्यामुळे ‘झाकली मूठ’ अशा गप्पा तुम्हाला शोभत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने भिसे जमीन प्रकरणात, तर उच्च न्यायालयाने शोषण प्रकरणात तुमचा जामीन फेटाळताना काय शेरे मारले होते, ते पुन्हा सांगू का? हिंमत असेल तर समोर या — ओपन डिबेट करू! स्थळ आणि वेळ तुम्ही ठरवा… आहें का हिंमत?”Jaykumar Gore
या थेट आव्हानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवार यांनी गोरे यांच्यावर केवळ वैयक्तिक हल्ला नाही तर संपूर्ण सरकारवरही भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.
त्यांनी पुढे म्हटलं,“देवेंद्र फडणवीस यांचे सरकार घोटाळ्यांनी बरबटलेले आहे. या सरकारला ना यंत्रणेची, ना न्यायव्यवस्थेची, ना जनतेची भीती उरलेली आहे. इतके भ्रष्टाचार झाले आहेत की कोळसाही लाजेल असे काळे कारनामे या सरकारचे आहेत. पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि गडचिरोली हे या सरकारच्या मलिदा खाण्याचे हॉटस्पॉट बनले आहेत. परप्रांतीय दलाल आणि ठेकेदारांना हाताशी धरून सत्तेतील मंडळी भ्रष्टाचाराची मेजवानी लावत आहेत. लवकरच या सरकारच्या काळ्या कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघाल्यावर महाराष्ट्राच्या इतिहासात हे सरकार सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून नोंदवले जाईल.”
जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, झाकली मूठ सव्वा लाखाची, तुमचे जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील, याचा विचार करावा.
“If You Have the Courage, Face Me!” Rohit Pawar Dares BJP Minister Jaykumar Gore to an Open Debate
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















