विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : Radhakrishna Vikhe Patil जिल्ह्यातील दुष्काळमुक्तीच्या घोषणांचा फक्त दिखावा झाला असून, प्रत्यक्षात निधी न दिल्याने अनेक प्रकल्प रखडले, असा घणाघाती आरोप जलसंपदा तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला. “‘जाणता राजा’नी फक्त बोलून दाखवले, पण कृती मात्र शून्य ठेवली,” अशा शब्दांत विखे यांनी सडेतोड टीका केली.Radhakrishna Vikhe Patil
विखे पाटील पारनेर तालुक्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कुकडी कालवा दुरुस्ती आणि सुधारणा कामांच्या शुभारंभ सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी पारनेर तालुक्यातील ४९ गावांतील सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली.Radhakrishna Vikhe Patil
विखे म्हणाले, “१९८२ पासून कुकडी कालव्यांना निधी मिळालाच नाही. अनेकांनी येथे येऊन केवळ भाषणबाजी केली, पण निधी मात्र दिला नाही. कालव्याच्या कामांना निधी मिळाला असता, तर चाळीस टक्के पाण्याची गळती आज टळली असती. १८०० क्युसेकने वाहणारा कालवा आता १४०० क्युसेकवर आला आहे. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवायचे असेल, तर काम केल्याशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यात काही नेते फक्त राजकारणासाठी येतात, पण निधी मंजूर करण्याची वेळ आली की मागे हटतात. मात्र महायुती सरकार वचन देऊन विसरत नाही; आम्ही विकासाच्या माध्यमातून जनता जोडतो.”
,महायुती सरकारने एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यातील १ ते ६० किलोमीटर कालव्याच्या दुरुस्ती कामांसाठी ८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. “आम्ही वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
विखे यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवत म्हटले, “रेडबुल वाटून विकास होत नाही. तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली, हे सर्वांना माहीत आहे. कामगारांना रस्त्यावर आणणारे आज विकासाचे ढोल वाजवत आहेत. मुंबईत बसून कारखाने चालतात का, असा प्रश्न मी विचारतो.”दुष्काळमुक्ती ही घोषणांनी नाही, तर कृतीने साध्य होते. पाणी असेल तरच विकास शक्य आहे. महायुती सरकार प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवते.”
आमदार काशिनाथ दाते यांनी या प्रसंगी सांगितले की, “कुकडी कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा दिलासा मिळेल. अनेक दशकांची तहान भागवण्याची ही वेळ आहे.”
आमदार शरद सोनवणे यांनीही विखे यांचे कौतुक करत म्हटले, “आमच्यावर वारंवार ‘पाणी मिळू देत नाही’ असा आरोप केला जात होता. मात्र आता जलसंपदा विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने आम्ही त्या आरोपातून मुक्त झालो आहोत.”
Drought-Free Promises Were All Show, No Funds Given — Radhakrishna Vikhe Patil Slams Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















