विशेष प्रतिनिधी
नाशिक: काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर, आता भूमिका मांडली आहे.
नाशिक येथे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या बैठकीत थोरात यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत अनेक गैरसमज दूर केले. मी नगर आणि नाशिक वेगळं मानत नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात. नाशिक येथे झालेल्या बैठकीत सीपीआयच्या प्रतिनिधींनी मला आमंत्रण दिलं होतं. तिथे कोण कोण उपस्थित राहणार आहे, हे मला माहीत नव्हतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मीडियाने वेगळा अर्थ लावू नये. हर्षवर्धन सपकाळ हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आम्ही नेहमीच एकत्र काम केलं आहे आणि पुढेही करत राहू.
बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितलं की, काँग्रेसचा निर्णय ठाम आहे, मनसेबरोबर कोणतीही आघाडी होणार नाही. त्यांच्या मनसे आणि काँग्रेसच्या संभाव्य युतीबाबत अफवा पसरल्या होत्या. मात्र, थोरात यांच्या भूमिकेमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसकडून मनसेसोबतच्या आघाडीला नकार दिल्यानंतर, मनसेची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे, काँग्रेस स्थानिक निवडणुकांसाठी स्वतंत्र तयारी करत असून, कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यावर वरिष्ठ नेते भर देत आहेत.
Congress will not go with MNS under any circumstances, Balasaheb Thorat made it clear
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीत लाल किल्ल्यापासल्या स्फोटात 7 गाड्या उद्ध्वस्त; दहशतवादी हल्ल्याचा संशय गडद!!
- Dr. Sampada Munde; : डॉ. संपदा मुंडेंना न्याय देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक, मरीन ड्राईव्हवर रास्ता रोको, गिरगाव चौपाटीवर आंदोलन
- Jaykumar Gore : हिम्मत असेल तर समोर या! रोहित पवार यांचे जयकुमार गोरे यांना खुले आव्हान
- Cracks in Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत फूट, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय



















