Ajit Pawar, : अजित पवार तुम्हाला मोदीही वाचवू शकणार नाहीत, अंजली दमानिया यांचा इशारा

Ajit Pawar, : अजित पवार तुम्हाला मोदीही वाचवू शकणार नाहीत, अंजली दमानिया यांचा इशारा

Ajit Pawar,

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar, सिंचन घोटाळ्यातून तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले. पण यावेळी तुम्हाला फडणवीसच नव्हे तर अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोडवू शकत नाहीत. मी तुम्हाला एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही याची खात्री बाळगा, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलाआहे. उद्या, बुधवारी सकाळी 10 वाजता मोठा गौप्यस्फोट करण्याचीही घोषणा केली.Ajit Pawar,

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पुण्यातील कथित भूखंड गैरव्यवहारावरून वादंग मजल्यावर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही नियुक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली.Ajit Pawar,



पत्रकारांशी बोलताना दमानिया म्हणाल्या, मी हायकोर्टाकडे अपिल करून सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह घोटाळा, जरंगेश्वर घोटाळ्याच्या सर्व फाईल्स हळूहळू बाहेर काढणार आहे. सिंचन घोटाळ्यातून तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले आहे. पण यापुढील कोणत्याही घोटाळ्यातून तुम्हाला फडणवीसच नव्हे तर अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुम्हाला सोडवू शकत नाही. मी कोर्टाकडून ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा. अंजली दमानिया यांनी यावेळी अजित पवारांचे नाव घेतले नाही. पण त्यांचा बोलण्याचा रोख त्यांच्याकडेच होता.

सरकारने जे 42 कोटी रुपये देऊन तो व्यवहार रद्द करण्याची नोटीस काढली आहे, ही नोटीसच मुळात चुकीची आहे. हा अधिकार महसूल विभागाकडे नाही. यासंबंधीचा कोणताही आदेश सिव्हिल कोर्टच देऊ शकते. त्यामुळे आत्ता जे सांगितले जात आहे की, चोरीचा माल आम्ही परत दिला आणि चोरी झालीच नाही. हा व्यवहार रद्द झाला आणि हा विषय संपला, असे बिल्कुल नाही. या सर्व गोष्टींचा एक प्रचंड मोठा खुलासा मी उद्या सकाळी 10 वा. करणार आहे, असेही अंजली दमानिया यांनी यावेळी सांगितले.

सरकारने या घोटाळ्याप्रकरणी एक समिती स्थापन केली आहे. पण अंजली दमानिया यांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही तर या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरही सवाल उपस्थित केला आहे. पार्थ अजित पवारचे नाव नाही आणि कंपनीचे पण नाव नाही? का? ह्यातून सुद्धा वाचवण्याची तयारी? बास करा राजकारण. चौकशी करा आणि शिक्षा द्या. ह्या वेळी जी समिती स्थापन होईल, त्यात फक्त शासकीय अधिकारी नाही, जनतेतून सुद्धा प्रतिनिधी हवेत. मी हे प्रतिनिधित्व करायला तयार आहे, असे त्या म्हणाल्या.

दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या ‘अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी’ या कंपनीने मुंढव्यातील ही जमीन मे महिन्यात खरेदी केली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे भागीदार आहेत. या व्यवहाराचा दस्त नोंदविताना अनियमितता झाली असल्याचे यापूर्वीच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यावरून विभागाकडून 30 ऑक्टोबर रोजी कंपनीला नोटीस बजाविण्यात आली, अशी माहिती नोंदणी विभागातर्फे देण्यात आली. सरकारच्या मालकीची जागा असल्यामुळे रेडीरेकनरमधील जमिनीच्या दराच्या पन्नास टक्के म्हणजे 146 कोटी रुपयांचा नजराणा भरणे बंधनकारक आहे. तो देखील संबंधित कंपनीने भरलेला नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Ajit Pawar, even Modi will not be able to save you, warns Anjali Damania

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023