Keshav Upadhye : शरद पवारांचे ओबीसी प्रेम हे पश्चातबुध्दी की निवडणुकीचे नवे नाटक? केशव उपाध्ये यांचा सवाल

Keshav Upadhye : शरद पवारांचे ओबीसी प्रेम हे पश्चातबुध्दी की निवडणुकीचे नवे नाटक? केशव उपाध्ये यांचा सवाल

Keshav Upadhye

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Keshav Upadhye शरद पवारांचे ओबीसी प्रेम हे पश्चातबुध्दी की निवडणुकीचे नवे नाटक आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. शरद पवारांचा इतिहास सांगतो की, त्यांना दाखविण्यापुरते ओबीसी लागतात, असे देखील ते म्हणाले.उपाध्ये यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शरद पवारांचे ओबीसी प्रेम हे पश्चातबुध्दी की निवडणुकीचे नवे नाटक?शरद पवारांनी त्यांचा पक्ष येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुळ ओबीसीनाच उमेदवारी असे जाहिर केले आहे. शरद पवारांचा इतिहास सांगतो की त्यांना दाखविण्यापुरते ओबीसी लागतात. Keshav Upadhye

ओबीसींचं नाव वापरायचं, पण त्यांचं नेतृत्व उभं राहू द्यायचं नाही हीच शरद पवारांची परंपरा!



एकसंध असतानाही राष्ट्रवादीने किती ओबीसी नेते तयार केले याची यादी करायची ठरवली तर या यादीतील संख्या दोन आकडी सुध्दा होत नाही. छगन भुजबळ हे शिवसेनेतून तर धनंजय मुंडे, एकनाथ खडसे हे भाजपातून आलेले तयार नेते होते. मतांची बेरीज करण्यासाठी तडजोड म्हणून सोबत घेतलेले हे दोन-तीन नेते वगळले, तर बोटावर मोजता येतील एवढेही ओबीसी नेते शरद पवार गटात नव्हते!
म्हणूनच, महाराष्ट्रात ओबीसींचा कट्टर विरोधक कोणी असेल तर तो शरद पवार गट. या पक्षाचा इतिहास काढून पहा, कायम ओबीसी विरोधी राजकारण या पक्षाने केले.

शरद पवारांनी कायम ओबीसी नेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेतली. महाराष्ट्रातील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडले, त्यात यश येत नाही पाहून शेवटी त्यांचे घर फोडले.

शरद पवार प्रभावाचे पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्हे व नाशिक नगरचा इतिहास आठवा आणि किती ओबीसी नेते शरद पवारांनी मोठे केले याची यादी काढा… उत्तर नकारात्मकच येते.

शिवाजी बापू शेंडगें याना राजीव गांधीचे समर्थन होते. पण त्यांचा पराभव कुणी केला हे सांगायला थोडा इतिहास वाचला तरी लक्षात येते.
पुणे जिल्ह्यात शिरूर सारख्या ठिकाणी पोपटराव गावडेना उमेदवारी दिली की पवारांचा पश्चिम महाराष्ट्राचा ओबीसीकोटा पूर्ण होत असे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात मोठ्या संख्येने तेली, माळी, धनगर, वंजारी व अन्य ओबीसी समाज असतानाही तिथे कोणी ओबीसी नेता मोठा झाला नाही.

प महाराष्ट्रतील सातारा जिल्ह्यातील कोरेगावमधून निवडून येणारे शंकरराव जगताप तसेच माण खटाव येथील भाऊसाहेब गुदगे या ओबीसी नेत्यांनाही पवारांनी कधी मदत केली नाही. कोल्हापूरातसुध्दा रत्नाप्पा कुंभार तर खुप ज्येष्ठ पण तिथे मानेना पवारांनी मदत केली.

कल्लपाअण्णाच्या पाठीशी ते कधी उभे राहिले नाही. नगरमध्ये बबनराव ढाकणेंच्या पाठीशी तर बाळासाहेब विखे उभे रहात असत. लातूरात ते कायम शिवराज चाकूरकरांच्या विरोधात राहिले. बीडला केशरकाकू स्वतःच नेत्या होत्या.

म्हणूनच आजच्या या घोषणेमागे ना आत्मपरीक्षण आहे, ना सामाजिक बांधिलकी.आहे ती ही केवळ मतपेटीसाठीची झटापट,
आणि पवारांच्या राजकारणातील नेहमीची जुन्याच नाटकाची नवीन आवृत्ती आहे.

Is Sharad Pawar’s Sudden ‘Love’ for OBCs Genuine or Just Pre-Election Drama? asks Keshav Upadhye

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023