शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र, गौतम अदानीही सोबत

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र, गौतम अदानीही सोबत

Sharad Pawar and Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

सातारा: आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांच्या कन्येच्या सातारा येथील विवाहसोहळ्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. या सोहळ्यात त्यांच्यासोबत उद्योगपती गौतम अदानी यांचीही उपस्थिती होती. या तीन मान्यवरांचे एकत्र असलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या भेटीची माहिती खुद्द शरद पवारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले की, आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो; नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. यासोबत शरद पवारांनी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एका सोफ्यावर शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी बसलेले आहेत. बाजूलाच देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बसल्याचे दिसून आले.



शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसमवेत नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत, तर दुसरीकडे राजकीय विरोधक म्हणून ते सत्ताधारी आणि भाजपवर सातत्याने टीकाही करतात. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करूनही, अलीकडेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवरून त्यांनी फडणवीस यांचे कौतुक केले होते. तसेच, उद्योगपती गौतम अदानी यांच्याशीही त्यांची जवळीक आहे. शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातही अदानींचा उल्लेख असून त्यांनी बारामतीला भेट दिली होती.

Sharad Pawar and Devendra Fadnavis together, Gautam Adani also with them

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023