विशेष प्रतिनिधी
परभणी : मराठवाड्याचा दौरा करताना शेतकऱ्यांना ‘एक बिस्किटचा पुडाही’ दिला नाही, अशी खोचक टीका करत ‘फुकटचा ताठा अन् नाव उबाठा’ असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. Eknath Shinde
मराठवाड्यातील परभणी येथे आयोजित मेळाव्यात शिंदे बोलत होते. ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्याचा दौरा करून, अतिवृष्टी अनुदानावरून महायुती सरकारला ‘दगाबाज’ संबोधले होते आणि मतदारांना त्यांना ‘वोटबंदी’ करण्याचे आवाहन केले होते. या आरोपांचा समाचार एकनाथ शिंदे यांनी घेतला. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, ठाकरेंनी एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले,
साधा बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत. माझ्या हातात काही नाही, असे ते म्हणाले. पण जेव्हा त्यांच्या हातात सत्ता होती, तेव्हा तरी त्यांनी काही दिले होते का? आम्हाला दगाबाज म्हणता, पण खरी दगाबाजी कुणी केली? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कुणी बांधली? हे जनतेने ओळखले आहे. म्हणूनच जनता आमच्या पाठीशी ठाम उभी आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.
जालना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आंबेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर थेट निशाणा साधला. 39 वर्षे संघटनेत राहूनही जर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर पाठवले जात असेल, तर निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत आहे? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी साध्या नगरसेवकही नसताना सहा महिन्यांत राज्यसभेवर कशा गेल्या? या लोकांकडे कोणती जादू आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आम्ही लोकांच्या प्रश्नांवर काम करतो आणि गुन्हे दाखल करून घेतो, पण हे आयते आलेले लोक मोठे कसे होतात? असा खडा सवाल करत, कार्यकर्त्यांशी संबंध नसणे हा उद्धव ठाकरे यांचा वीक पॉईंट आहे, अशी स्पष्ट भूमिका आंबेकर यांनी मांडली.
Deputy CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















