विशेष प्रतिनिधी
पुणे : Anjali Damania पवार यांच्या अमेडिया कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीला याचा अभ्यास करू द्या, काय अहवाल येतो ते पाहू. पण माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मला योग्य वाटेल ते मी करेन, असे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.Anjali Damania
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराप्रकरणी दमानिया यांनी मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत असा इशारा दिला आहे. मी सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा बाहेर काढणार आहे. अजित पवारांच्या आजवरच्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीला याचा अभ्यास करू द्या, काय अहवाल येतो, त्याबद्दल निर्णय वरिष्ठ घेतील, तोपर्यंत मी कोणतेही भाष्य करणार नाही.Anjali Damania
पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हा रस्ता दत्तक घेण्याच्या योजनेच्या शुभारंगप्रसंगी अजित पवार बाेलत हाेते. ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी आम्ही ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते, नंतर पुन्हा पाऊस पडला त्यामुळे त्यामध्ये ८ हजार कोटी रुपये वाढवून ते पॅकेज ४० हजार कोटी रुपये केले आहे.
पुण्यातील गुन्हेगारीच्या प्रश्नावर बाेलताना अजित पवार म्हणाले की, पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीविषयी विशेषतः अल्पवयीन मुले गुन्हेगारीत येत आहेत, १४ ते १५ वर्षांखालील मुले गुन्हे करत आहेत, अल्पवयीन मुलाचे वय १८ वर्ष आहे, ते काढून कमी करावे हे केंद्र सरकारच्या देखील लक्षात आणून देत आहोत, काही चुकीचे लोक त्यांचा हेतू साधण्याकरिता अल्पवयीन मुलाला सामावून घेत आहेत, कारण ते अल्पवयीन असल्यामुळे गुन्हा दाखल करायला अडचणी होतात. केंद्र सरकार ही गोष्ट गांभीर्याने घेईल.
I will do whatever I feel is right, keeping in mind my conscience, says Deputy Chief Minister Ajit Pawar’s reply to Anjali Damania
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















