विशेष प्रतिनिधी
बीड : धनंजय मुंडेंमुळे वंजारी समाजालाही सूख नाही. एक चांगली जात याच्यामुळे बदनाम होत आहे. आता त्यांना हा रस्त्यावर उतरवत आहे. म्हणजे पुन्हा गरिबांना त्रास झाला. गरिबांच्या झुंजी लावून हा दूर बसणार नाही. आता वंजारी, मराठा, दलित, मुस्लिम, बहुजन आदी कुणीच नको. आपण दोघेच पाहू. तू नार्को टेस्टला चल, असे आव्हान मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे.
मुंडे यांच्यावर निशाणा साधताना जरांगे म्हणाले, धनंजय मुंडे हे शेखचिल्ली आहेत. ते ज्या फांदीवर बसतात, तीच फांदी तोडतात. त्यांनी नार्को टेस्टच्या मागणीवरून मागे हटू नये. या चाचणीतून तरी त्यांनी महादेव मुंडे यांचे काय केले, बापू आंधळेंचे काय केले, गित्तेचे काय केले व संतोष देशमुख प्रकरणात काय केले हे समोर येईल. नार्टो टेस्टमधून त्यांनी अंधारात किती चाली रचल्या हे ही सत्य समोर येईल.
आपल्या घातपाताचा कथित कट रचल्याप्रकरणी मुंडे यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, मी लपत नाही. मला लपता पण येत नाही. राजकारणाचा मला नादच नाही. पण समाजाच्या जिवावर उठल्यानंतर मी दम खात नाही. तुम्ही तुमचे राजकारण करा. मोठे व्हा. मराठ्यांवर अन्याय का करता? तुम्ही अन्याय केला. मग मी सोडणार नाही. तुम्ही कितीही जहागीरदार असला तरी मी सोडणार नाही. मला आत्ताच्या प्रकरणातही राजकारण आणायचे नाही. माझ्या घातपाताच्या प्रकरणात मी नार्को टेस्टची मागणी केली नाही. त्या माणसाने केली. आत्ता लपायचे नाही. चला नार्को टेस्टला. जातवान वागायचे. त्यांनी टेस्टची तयारी दर्शवल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी अर्ज केला. माझा अर्ज चुकीचा असेल, तर तुम्ही कसाही लिहून आणा. कोर्टात चला, हायकोर्टात चला, राज्यपालांकडे चला, राष्ट्रपतींकडे चला, कुठेही चला. तिथे सह्या केल्या नाही तर दोन बापाची अवलाद. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आम्हाला खोटे चालत नाही.
मनोज जरांगे म्हणाले, राजकारण सुरूच असते. पाडापाडीही सुरू असते. एकमेकांवर टीका करणेही सुरू असते. पण तुम्ही माझ्या घातपातापर्यंत गेलात. आता तुम्हाला सुट्टी नाही. चल, लपू नको. एका बापाचे असल्यासारखे नार्कोटेस्टला निघायचे. प्रस्तुत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कांचन साळवी नामक तरुणाची मला ओळखही नाही. त्यांनी त्याला त्याच्या घरी येऊन परळीला नेले. त्याने सांगितले की, आम्ही परळीच्या बैठकीला गेलो होतो. याचा अर्थ खुनाचा कट परळीत शिजला.
हा कट स्वतः धनंजय मुंडे यांनी रचला. हे दोन-चार आरोपींनी मिळून रेस्ट हाऊसमध्ये बसून हा कट शिजवला. हेच सत्य आहे. ते समोर येईल. आता फक्त अजित पवारांनी सांभाळून राहावे. त्यांनी खोडा घालू नये. विनाकारण त्यांना बळ देण्याचे काम करू नये. अन्यथा मोठा घोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचे नाही. तुमची व माझी नार्टो टेस्टची तयारी आहे. मग प्रॉब्लेम काय? मी नार्कोटेस्ट करतो. त्याहून अधिक मोठी चाचणी असेल तर त्यालाही सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले, धनंजय मुंडे यांनी या टोकाला जायला नको होते. विरोध करणे सुरूच असते. पण तू मुळावरच उठायला लागला. मी एवढा सोपा आहे का? मला गोळ्या, औषध घालण्यास सांगता. बाया जेवणात औषध घालतात. त्यामुळे ते आता महिलांचे धंदे करत आहेत. मराठा जिंकण्यासाठी मी जिद्दीने लढलो. जिद्दीने लढणाऱ्याला त्यांनी हरवायचे प्रयत्न न करता, खून करण्याचे कट रचले. मराठ्यांविषयी कट रचले. मराठ्यांना हलवण्यात कुणाची हिंमत नाही. त्यामुळेच ते कट कारस्थान रचत आहेत.
Vanjari caste defamed by Dhananjay Munde, attacked by Manoj Jarange, challenged by narco test
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















