विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटात महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि माजी प्रवक्त्या रुपाली ठाेंबरे यांच्यात वाद सुरू आहे. रुपाली पाटील यांच्यावर पक्षाने कारवाईही केली आहे. त्याचबराेबर त्यांच्याकडे खुलासाही मागिला हाेता. मात्र, यावरून आक्रमक हाेत रुपाली ठाेंबरे यांनीच पक्षाला पत्र लिहून खुलासा मागितला आहे.
लटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रूपाली चाकणकरांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून पक्षाच्या वतीने रूपाली ठोंबरे यांना नोटीस बजावत सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, आता मी नेमका कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे? असा सवाल करत, रूपाली ठोंबरे यांनी पक्षाकडेच खुलासा मागितला आहे.
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या ‘असंवेदनशील’ वक्तव्यावरून दोन्ही रूपालींमध्ये वाद सुरू झाला होता. रूपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकरांच्या वक्तव्यावर टीका करत पुण्यात थेट धरणे आंदोलन केले होते. पक्षातील हा वाद वाढू नये म्हणून अजित पवारांनी यावर बोलणे टाळले असतानाच, अलीकडेच पक्षाकडून रूपाली पाटील ठोंबरे यांना ‘खुलासा’ मागवणारे पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रानंतर आता रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षालाच प्रतिप्रश्न केल्यामुळे पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
रुपाली ठाेंबरे यांनी पक्षाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण दिनांक 07/11/2025 रोजी जावक क्रमांक 1313 द्वारा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्या बाबतीत प्रसार माध्यमांमध्ये केलेले वक्तव्य पक्षशिस्त मंग करणारे आहे व त्यासंदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत खुलासा पत्र मागवले आहे.
त्याबाबत आपणास खुलासा येणेप्रमाणे राज्य महिला आयोग अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष यांचे बाबत नक्की कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे आहे. याविषयी नोटीस मध्ये कोणताही माहिती नसल्याने त्याबाबत खुलासा देणे शक्य नाही. सविस्तर एखादे वाक्य आपण आपल्या नोटीसीमध्ये नमूद केले असते तर त्यावर मला खुलासा करणे योग्य झाले असते. तसेच राज्य महिला आयोग व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र विभाग आहेत.
त्यावर माझे सांगणे की, स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केले होते त्यामध्ये समाज माध्यमांमध्ये तसेच लोकांमध्ये अत्यंत रोष, असंतोष निर्माण झाला होता. राज्य महिला आयोगाने केलेले वक्तव्याने पक्षालासुद्धा रोषाला सामोरे जावे लागत होते. पक्षाची अत्यंत बदनामी झाली त्यानंतरून मी स्वतः बीड येथे जाऊन डॉक्टर संपदा मुंडे यांचे कुटूंबीय व आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. अजित दादा पवार यांची बोलणे करून दिले होते त्यावेळी देखील मा.दादांनी मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते.
मी केवळ राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मताचा सन्मान करून माझे म्हणणे मांडले होते. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणे हे प्रवक्त्याचे प्रथम कर्तव्य असताना सदरची नोटीस का देण्यात आली याची कल्पना नाही. त्यामुळे कोणताही शिस्त भंग झालेला नाही. तसेच याबाबत हा माझा खुलासा समजावा.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार म्हणाले, मी रूपाली (ठोंबरे) ताईंना भेटलो. त्यांच्याशी बोललो त्यावेळी अभय मांढरे देखील माझ्यासोबत होता. मी त्यांना जे काही सांगायचे ते सांगितले आहे. तो आमच्या परिवारातील अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही कुटुंब आणि परिवार म्हणून सगळं पाहातो. त्यामुळे पत्रकारांना खमंग बातम्या मिळतील, अशी अपेक्षा ठेऊ नका. तुमच्यामध्ये वाद झाल्यावर तुम्ही ज्या पद्धतीने मिटवता, त्याच पद्धतीने मलाही माझ्या पक्षातील वाद मिटवावा लागेल. आम्ही पक्षातील निर्णय सर्वजण बसून घेतो.
Rupali Thombre is aggressive, writes a letter and seeks clarification from the party itself
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















