विशेष प्रतिनिधी
पुणे : आधी पक्षाला प्रायोरिटी आहे. पक्षाने आमचे ऐकले, योग्य सन्मान ठेवला, तर घड्याळावर लढणार आहे. पक्षाने आम्हाला कोलले तर आम्हीही पक्षाला कोलल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना इशारा दिला आहे. Pradeep Garatkar
इंदापूर येथे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला आहे. माजी उपनगराध्यक्ष भरत शाह यांना पक्षात घेण्यास विराेध आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजित पवार, दत्तात्रय भरणे आणि प्रदीप गारटकर यांच्यात निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. चर्चेनंतर रात्री इंदापुरात गारटकर यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीनंतर गारटकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शाह यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला.
प्रदीप गारटकर म्हणाले, आपली आणि आपल्यासोबत येणाऱ्यांची ताकद एकत्र केली, तर एकतर्फी निवडणूक होईल. माझी अनेकांशी बोलणी सुरू असून आपल्याला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत. सन्मानाने मार्ग काढून एकत्र पॅनल उभे करूया. हे मी त्यांनाही (अजित पवार, दत्तात्रय भरणे) सांगितले आहे. आधी पक्षाला प्रायोरिटी आहे. पक्षाने आमचे ऐकले, योग्य सन्मान ठेवला, तर घड्याळावर लढणार आहे. पक्षाने आम्हाला कोलले तर आम्हीही पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही.
प्रदीप गारटकर म्हणाले, 17 तारखेला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. मी पक्षाच्या विरोधात पॅनल उभे करत असेल तर पदावर राहणे माझा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे वाट पाहून 17 तारखेला पक्षाचा राजीनामा देईल.
If the party beats us, we will not remain without beating the party. Pradeep Garatkar’s warning
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















