Madvi Hidma : मोस्ट-वाँटेड नक्षल नेता मडवी हिडमा ठार, २६ भीषण हल्ल्यांचा सुत्रधार

Madvi Hidma : मोस्ट-वाँटेड नक्षल नेता मडवी हिडमा ठार, २६ भीषण हल्ल्यांचा सुत्रधार

Madvi Hidma

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : Madvi Hidma सुरक्षा दलांनी भारतातील सर्वात मोस्ट वाँटेड नक्षल कमांडर मडवी हिडमा याला ठार केले आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगलात मंगळवारी सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान झालेल्या एन्काऊंटरमध्ये हिडमा ठार झाला. छत्तीसगढच्या सीमेवरून पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न सुरक्षादलांनी हाणून पाडला. या चकमकीत हिडमाची पत्नी राजे, तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर चेल्लुरी नारायण आणि टेक शंकर यांनाही ठार करण्यात आले.Madvi Hidma

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी याआधी अनेकदा सांगितले होते की मार्च २०२६ पर्यंत भारत नक्षलवादमुक्त होईल. सुरक्षा यंत्रणांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हिडमाला पकडण्याची अंतिम मुदत निश्चित केली होती. त्याआधीच म्हणजे तब्बल १२ दिवस आधी हिडमा मारला गेला.Madvi Hidma



हिडमा हा छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पुर्वथी गावचा रहिवासी. गरीब आदिवासी कुटुंबातून आलेल्या हिडमाने दंडकारण्याच्या जंगलात जवळपास दोन दशकांच्या काळात नक्षल संघटनेत महत्वाची भरारी घेतली. त्याने “हिडमलू” आणि “संतोष” अशीही नावे वापरली.तो पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) बटालियन क्रमांक १ चा प्रमुख होता. नक्षलवाद्यांची सर्वात घातक हल्ला पथक म्हणून ही बटालियन ओळखली जाते. CPI (माओवादी) च्या केंद्रीय समितीवरील सर्वांत तरुण सदस्य म्हणून तो कार्यरत होता. बस्तरमधून या स्तरावर पोहोचणारा तो एकमेव आदिवासी नेता होता.केंद्र आणि राज्य सरकारांनी त्याच्यावर लावलेली एकत्रित इनाम रक्कम १ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.

१९८१ मध्ये जन्मलेला हिडमा, किशोरवयातच CPI (माओवादी) मध्ये सामील झाला. साधा कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून तो लवकरच गुरिल्ला रणनीती, सापळे लावणे आणि जंगलातील युद्धतंत्र यात निपुण झाला. बहुतेक वरिष्ठ नक्षल नेते लढाईपासून दूर राहत असताना, हिडमा स्वतः आघाडीवर लढणारा नेता म्हणून प्रसिद्ध झाला.

२०१० च्या दंतेवाडा हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष त्याच्याकडे गेले. या हल्ल्यात ७६ CRPF जवानांचा मृत्यू झाला होता. पुढे २०१३ च्या झिरम घाटी हल्ल्यात छत्तीसगडमधील वरिष्ठ काँग्रेस नेतृत्वाचा बळी गेला आणि २०१७ मधील सुकमा हल्ल्यात २६ जवान मारले गेले. या तिन्ही मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड म्हणून हिडमाचे नाव सर्वाधिक चर्चेत आले.तो नेहमी घनदाट जंगलात लपून राहत असे. त्याच्या आजूबाजूला निष्ठावान अंगरक्षकांचे सुरक्षावर्तुळ असे. अनेक वर्षे त्याचा एकही फोटो सुरक्षा यंत्रणांकडे नव्हता. यंदाच त्याचा पहिला स्पष्ट फोटो समोर आला होता.

हिडमाचा मृत्यू हा नक्षलवादावर मोठा निर्णायक वार मानला जात आहे. दक्षिण बस्तरमध्ये घडलेल्या जवळपास सर्व मोठ्या नक्षल हल्ल्यांच्या मागे त्याचा हात होता. सुरक्षादलांसाठी तो सर्वांत धोकादायक लक्ष्य मानला जात होता. त्याच्या मृत्यूनंतर नक्षल संघटनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे,

Most-wanted Naxal leader Madvi Hidma killed, mastermind of 26 deadly attacks

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023