विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साेबत घेतल्यास परप्रांतियांची मते मिळणार नसल्याने काॅंग्रेसने ठाकरे गटाचीही साथ साेडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जुने मित्र असलेल्या शरद पवारांचा हात मात्र हातात घेणार आहे. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद अगदीच जेमतेम असल्याने जागावाटपात आपलाच वरचष्मा राहणार असल्याचे काॅंग्रेसला वाटत आहे.Sharad Pawar
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसने आता आपला जुना मित्रपक्ष असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड यांनी आज शरद पवारांशी चर्चा केली आहे. त्यांनी ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचा दावा केल्यामुळे पवार काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे एकटे पडणार आहेत.Sharad Pawar
काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गेल्या आठवड्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही घोषणा केली. त्यानंतर आता काँग्रेस आपली पुढील रणनीती ठरवण्यात व्यस्त आहे. या अंतर्गत काँग्रेस खासदार तथा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे बीएमसीची निवडणूक एकत्र लढवण्याचा प्रस्ताव ठेवला.
पत्रकारांशी बोलताना गायकवाड म्हणाल्या, मुंबई महापालिका निवडणुकीत याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली आहे. लोकशाही आणि संविधान मानणारे आम्ही पक्ष यावेळी एकत्र निवडणूक लढवावी ही आमची अपेक्षा आहे. याबाबत आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे.पुढच्या आठवड्यात पुन्हा याबाबत चर्चा होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही इथल्या नागरी समस्या जसे ट्रॅफिक, खराब रस्ते, शिक्षण, पाणी, प्रदूषण ,महापालिकेतील भ्रष्टाचार या विषयांवर झाली पाहिजे.
ही निवडणूक धर्म, जात, भाषा यावर नको. कारण मुंबई हे असे शहर आहे जिथे देशातील सगळ्या राज्यातून लोक येतात. सगळ्यांचा या शहरातील विकासात हातभार आहे. आमची आज खूप चांगली चर्चा झाली. आमची नैसर्गिक आघाडी आहे. आम्ही सर्वजण संविधानाचा धागा मानतो. आम्ही लोकशाही मानतो. या देशात समता, बंधूता, न्याय, स्वातंत्र्य राहिले पाहिजे. मुंबईची एकता कायम राहिली पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांच्यापुढे मांडली आहे, असे त्या म्हणाल्या.
वर्षा गायकवाड यांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा देत काँग्रेसची मनसेसोबत जाण्याची इच्छा नसल्याचा पुनरुच्चार केला. संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. यासाठी त्यांनी ही निवडणूक स्थानिक पातळीवरील असल्याचा दावा केला होता. आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण आमची त्यांच्याशी आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही दडपशाही करणाऱ्या व कायदा हातात घेणाऱ्याबरोबर निवडणुकीत एकत्र जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
Congress declines support to the Thackeray camp, decides to join hands with Sharad Pawar.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















