विशेष प्रतिनिधी
साेलापूर : राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी ह्याना सत्तेचा अति माज आलाय.ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्या बद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच पण तूर्तास या औलादीच्या मस्तीच्या वागण्याने “मालकाला” भिकारी बनवेल, असा हल्लाबाेल राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमाेल मिटकरी यांनी केला. Amol Mitkari
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अनगरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. या पदासाठी सुरुवातीला तीन अर्ज दाखल झाले होते. मात्र, यापैकी भाजपा उमेदवाराचा अर्ज वैध ठरला आहे. भाजपा उमेदवाराला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ( अजित पवार ) उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. तसेच अनगरमध्ये केवळ १७ भाजपा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या विरोधात अर्ज दाखल झालेले नाहीत, यामुळे अनगरची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी बाळराजे पाटील यांनी एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून जल्लोष करत होते. यावेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाले, अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय’, असे विधान करत त्यांनी ठेका धरला. या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, या प्रकारावर राजन पाटील यांनी माफी मागितली आणि मोठ्या मनाने हा विषय संपवण्याची विनंती केली. आमच्या गावात कधीच निवडणूक झाली नाही. तरुण पोरं थोडी उत्साही असतात. निवडणूक झाल्यामुळे त्यांनी तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमच्या मुलाने जे वक्तव्य केले त्याचे मी समर्थन करणार नाही. राजकारणात तो लहान आहे. त्यांच्या तोंडून नकळत अशा प्रकारचे वक्तव्य गेलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज मी त्यांच्यापासून दूर गेलो त्याला अजित पवार कारणीभूत आहेत असं मी म्हणणार नाही.
मी त्यांचे नेतृत्व मान्य केलं. आतापर्यंत जे वैभव उभं केलं त्यामध्ये शरद पवार आणि अदित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. मुलाच्या तोंडून जे काही अपशब्द आले ते नको व्हायला होते. त्याबद्दल मी अजित पवार आणि पवार कुटुंबाची दिलगिरी व्यक्त करतो. क्षमा व्यक्त करतो. माझी विनंती आहे की हा विषय इथे थांबवावा. एखादा मुलगा चुकला तर त्याला पदरात घ्यायचं असतं. अजित पवारांनी त्याला पार्थ आणि जय पवार यांच्यासारखे समजावे. ही विनंती मी त्यांना करतो. भावनेच्या भरात मुलांसमोर बोलताना त्याच्या तोंडून तो शब्द गेला. मुलाने मांडीवर घाण केली तर आई मांडी कापत नाही. तुम्ही मोठ्या मनाने हा विषय संपवून टाकावा.
Amol Mitkari target to Rajan Patil
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















