विशेष प्रतिनिधी
सांगली : Eknath Shinde बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे. ही परंपरा जगभर पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी पुढील कालावधीमध्ये प्रो बैलगाडा लीग सुरू करण्यात येईल. शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. Eknath Shinde
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या बोरगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, गर्दीवरून सांगू शकतो की, ही शर्यत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल यात शंका नाही. बैलजोड्यांची संख्या, चाहत्यांची उपस्थिती, रेकॉर्ड ब्रेकिंग सहभाग आणि थरारक स्पर्धा हाच या वर्षीचा श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे वैशिष्ट्य ठरले . Eknath Shinde
परंपरा, श्रद्धा आणि भविष्यातील योजना शर्यतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रेरणा, रोजगार आणि आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, बैल हा शेतकऱ्याचा विश्वासू साथी आहे. बैलगाडा शर्यत म्हणजे मातीचा अभिमान. ती आपण जपलीच पाहिजे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड, मनरेगातून अनुदान आणि कृषी पायाभूत सुविधा यांसाठी अतिरिक्त प्रकल्प राबविण्यात येत आहेत ही मालक-नोकरांची संस्था नाही; हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
Pro Bullock Cart League to be launched, Deputy Chief Minister Eknath Shinde announces
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















