विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचे पोलिस संरक्षण नाकारले असून, आपले संरक्षण तातडीने काढून घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जालन्यात पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे जरांगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी अर्ज देऊन ही अधिकृत विनंती केली आहे. Manoj Jarange Patil
जालना पोलिस अधीक्षकांना सादर केलेल्या अर्जामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी थेट आरोप केला आहे की, आपल्या घातपाताच्या कटाचे मुख्य सूत्रधार आमदार धनंजय मुंडे हेच आहेत. मुंडे यांना सरकार वाचवत आहे. त्यामुळे आपल्याला सध्या दिलेले पोलिस संरक्षण तत्काळ काढून घेण्यात यावे. Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा तब्बल अडीच कोटी रुपयांत कट रचल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत बीडमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार पोलिस अधीक्षकांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गेवराई येथील दोन संशयितांना पथकाच्या माध्यमातून तातडीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एक जण जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.
या संपूर्ण कटामागे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केला होता. याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले होते, माझ्या खुनाचा कट रचला गेला हे सत्य आहे. कट शिजला गेला, यात शंका नाही. यासंदर्भात पोलिस अधीक्षक स्वतः लक्ष घालून आहेत. तपासात दूध का दूध पाणी का पाणी होईल. जरांगे यांनी मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Manoj Jarange Patil refuses police protection for himself
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















