विशेष प्रतिनिधी
सांगोला : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. एवढा निधी देऊनही सांगोल्याचा विकास का झाला नाही? याचे उत्तर बापूंनी द्यावे, असा सवाल गोरे यांनी केला आहे. ही निवडणूक कोणाचे तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नाही, असा टोलाही लगावला. Jaykumar Gore
जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे. शहाजीबापू पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर नाव न घेत टीका केली होती. त्याला उत्तर देताना जयकुमार गोरे म्हणाले, गेले पाच वर्ष सांगोल्यासाठी एवढा मोठा निधी मिळूनही विकास कामे का झाली नाहीत याचे उत्तर आधी शहाजी बापूंनी द्यावे. कोणाचे तरी चालवण्यासाठी किंवा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसून ही जनतेच्या प्रश्नासाठी ची निवडणूक आहे.
सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे कट्टर विरोधक असलेल्या शेकापला आणि अजित पवार गटाचे सहकारी दीपक साळुंखे पाटील यांना सोबत घेऊन बापूंच्या विरोधात उमेदवार उतरवल्याने शहाजीबापू पाटील नाराज आहेत. याच नाराजीतून त्यांनी काल भाजपवर टीका करताना, भाजपचे सुरू असलेले राजकारण हे हिडीस, किळसवाणे आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखे आहे, अशी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून, आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापूंना सडेतोड उत्तर देत त्यांच्यावर सडकून टीका केली.
Mahayuti clash erupts in Sangola, Jaykumar Gore
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















