विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray आजच आपण वाचले की कुणीतरी दिल्लीला गेलं होतं बाबा मला मारलं म्हणून. लाचारी का? तर त्यांना चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.Uddhav Thackeray
शिक्षक आमदारांच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले, आयुष्यात चांगला शिक्षक आणि चांगलं शिक्षण मिळालं नाही तर काय होतं? दिवटी म्हणजे मशाल असते आणि दिवटा म्हणजे? असे काही दिवटे आहेत ज्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही. मराठी भाषेची ही गंमत आहे. शिक्षक मतदारसंघातून आपला लोकप्रतिनिधी कुठलाही वाह्यातपणा न करता शिक्षक म्हणून आपल्या कामात वेगळा ठसा उमटवतोआहे.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्या आमदारकीचा फंड आहे तो शिक्षणासाठीच वापरा. विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार असेल तर फंड देण्यासाठी मुठी आवळल्या जातात. आता त्यांच्यात एकमेकांच्या नसा आवळल्या जात आहेत. माझ्या आजोबांना आणि बाळासाहेबांना सातवीत शाळा सोडावी लागली. कारण फी भरण्याची ऐपतच नव्हती. पण शाळा सोडावी लागली तरी शिक्षण थांबले नाही. आपल्या मुलांना आई वडील संस्कार देतात हणजे काय? तर ते वागणुकीतून देत असतात.Uddhav Thackeray
माध्यमं आता बदलत आहेत, आता शाळांमध्ये पाटी आहे की नाही मला माहीत नाही. आपली अक्षरं आईने गिरवून घेतली आहेत. त्यामुळेच मराठीला आपण मातृभाषा म्हणतो. पाटीवर अक्षरं गिरवून मोठी झालेली आपण माणसं. शिक्षक म्हणून मोठं झाल्यानंतर आपल्यासारख्या माणसानेच संगणक शोधला आहे हे विसरता कामा नये. मध्ये मी सोनम वांगचुक यांचा कार्यक्रम पाहिला. चांगल्या लोकांना देशद्रोही ठरवून कसं तुरुंगात टाकलं जातं याचं सोनम वांगचूक हे उत्तम उदाहरण आहे. त्यांचा उपयोग करुन घ्यायला हवा. नको तो शिक्का मारुन त्यांना आतमध्ये टाकून दिले आहे. त्यांनी सांगितलं की ते लेह लडाखमध्ये राहतात. तिथे शाळा नव्हती. त्यांनी सांगितलं की आईने मला मातृभाषेत अनेक गोष्टी शिकवल्या ज्याचा उपयोग मला आत्ता होतो आहे. आमच्याकडे एफ फॉर फॅन नाहीच तर दाखवणार काय? जी काही पद्धत आही ना ती बदलली पाहिजे अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
Uddhav Thackeray targets Shinde, says someone ran to Delhi with a complaint
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















