विशेष प्रतिनिधी
पुणे : मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने आणि प्राधान्याने सुरू कराव्यात, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत, अशी माहिती पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. Nitin Gadkari
नवले पूल येथे नुकत्याच झालेल्या अपघातात आठ जणांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत हा अपघात व उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
‘नवले पुलाजवळील अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’ ची संख्या कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती गडकरी यांना दिली. त्यानंतरही नुकत्याच झालेल्या अपघातानंतर अधिक प्रभावी व तातडीची पावले उचलण्याची गरज असल्याकडे गडकरी यांचे लक्ष वेधले. तसेच या अपघातानंतर पुण्यात महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, पोलिस व महामार्ग प्राधिकरणासोबत घेतलेल्या बैठकांमध्ये निश्चित झालेल्या उपाययोजनांबाबतचा अहवालही गडकरी यांच्याकडे सादर करत याबाबत केंद्रीय स्तरावर तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी केली,’ असे मोहोळ म्हणाले.
मोहोळ म्हणाले, नवले पूल येथील अपघात थांबावेत, यासाठी मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेत या संदर्भातील बैठकांचा अहवाल सादर केला. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.
बैठकीत चर्चिले गेलेले मुद्दे
– अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर ठोस चर्चा
– एनएचएआयमार्फत रस्त्याची रचना.
– खेड-शिवापुर टोल नाक्यावर वाहनांचा लोड तपासणे
– टोल नाक्यावर आरटीओ मार्फत वाहनांची यांत्रिक तपासणी.
– वेगमर्यादेवर नियंत्रण आणणे.
– बॅरिकेडिंग व सिग्नल यंत्रणेत सुधारणा.
– धोकादायक ठिकाणांची पुनर्रचना.
– ठरावीक अंतरावर रम्बलर स्ट्रीप्सची संख्या वाढवणे
– सर्व यंत्रणांमधील समन्वय वाढविणे.
Nitin Gadkari orders NHAI to take immediate measures to prevent accidents near Navale Bridge
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















