अवघ्या २० दिवसांपूर्वी घेतलेली थार, काेकणात फिरायला निघाला असताना सहा मित्रांवर काळाचा घाला

अवघ्या २० दिवसांपूर्वी घेतलेली थार, काेकणात फिरायला निघाला असताना सहा मित्रांवर काळाचा घाला

विशेष प्रतिनिधी

पनवेल : ताम्हिणी घाटात थार गाडी काेसळून झालेल्या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला. यातील माेमाेजचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने अवघ्या २० दिवसांपूर्वीच थार गाडी खरेदी केली हाेती. मित्रांना काेकणात फिरायला घेऊन जाताना थार गाडी ताम्हिणी घाटातील पाचशे फुट दरीत काेसळली. Tamhini Tragedy

अपघाताच्या दोन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्याने या तरुणांच्या घरच्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे.

दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. प्रथम शहाजी चव्हाण (वय वर्ष 22), साहिल साधू बोटे (वय वर्ष 24), श्री महादेव कोळी (वय वर्ष 18), ओंकार सुनील कोळी (वय वर्ष 18), शिवा अरूण माने (वय वर्ष 19), पुनीत सुधाकर शेट्टी (वय वर्ष 20 – सर्वजण राहणार पुण्यातील भैरवनाथ नगर, उत्तम नगर येथील) यांचा मृत्यू झाला आहे. यातील साहिल बोटे या तरुणाने अवघ्या 20 दिवसांपूर्वी थार ही जीप घेतली होती. साहिलचा मोमोज बनवण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात त्याला चांगले यश मिळविले. पुण्यात तीन ठिकाणी मोमोजच्या गाड्या टाकून व्यावसाय वाढवला. प्रचंड मेहनत करून त्याने याच व्यवसायाच्या जोरावर गेल्या वर्षीच एक फ्लॅट विकत घेतला. काही दिवसांपूर्वीच थार सुद्धा घेतली.

थार घेतल्यानंतर या तरुणांनी कोकणात फिरायला जाण्याचा प्लॅन केला. त्यामुळे सोमवारी हे सहाही तरुण कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास निघाले. पण प्रवासाला निघाल्यानंतर तीन दिवस झाले तरी कोणत्याही मित्रांचा त्यांच्यासोबत संपर्क झाला नाही. ज्यामुळे या तरुणांच्या अन्य काही मित्रांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. फोन बंद असल्याने शहाजी विकास चव्हाण यांनी पुणे जिल्ह्यातील उत्तम नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी रायगड पोलिसांशी संपर्क साधत सर्वांचा शोध घेण्यास सुचित केले होते. त्यानुसार रायगड पोलिसांनी बेपत्ता मुले आणि महिंद्रा थार गाडीचा शोध सुरू केला होता. गुरुवारीसकाळी त्यांची थार गाडी ताम्हिणी घाटात एका 500 फूट खोल दरीत पडली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने शोध घेतला असता, ही भीषण दुर्घटना समोर आली. 17 नोव्हेंबरच्या रात्रीच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी संरक्षक कठडे तोडून खाली गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक बचाव पथकांना मदत आणि बचाव कार्यासाठी पाचारण केले. खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढणे अतिशय आव्हानात्मक होते. त्यामुळे प्रशिक्षित रॅप्लर्सची मदत घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. नंतर मृतदेह काढून माणगाव येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. याप्रकरणाचा माणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी निवृत्ती बोऱ्हाडे पुढील तपास करत आहेत. तर, खोल दरीत दुर्घटना घडल्याने मृतदेह बाहेर काढणे आव्हानात्मक होते. घनदाट झाडी आणि तीव्र उतार असल्याने बचाव कार्यात अडचणी येत होत्या. मात्र, प्रशिक्षित बचाव पथकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम करण्यात आले आहे, असे रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले आहे.

ताम्हिणी घाटातील रस्ता अत्यंत वळणावळणाचा आणि दगडांनी भरलेला आहे. प्राथमिक तपासात, रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले असावे, असे दिसून आले आहे. या दुर्घटनेमुळे घाटातील सुरक्षित वाहनचालनाची गरज अधोरेखित झाली आहे. पोलीस या अपघाताचा सखोल तपास करत आहेत. या घटनेनंतर ताम्हिणी घाटातील प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून अपघातप्रवण रस्त्यावर आवश्यक सूचना व सतर्कतेचे उपाय करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.

New Thar Bought 20 Days Ago, All Six Youth Dead in Tamhini Tragedy

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023