विशेष प्रतिनिधी
पुणे : Rajgurunagar पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी चक्क लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. गावाच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी 1 कोटी 3 लाख, तर महिला राखीव जागेसाठी 22 लाख रुपये इतक्या बोली लावल्या गेल्याची चर्चा आहे.Rajgurunagar
निवडणूक बिनविरोध व्हावी आणि विकासासाठी निधी उभा राहावा या कारणांनी गावकऱ्यांनीच हा मार्ग अवलंबल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभागात अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरणार होते. त्यामुळे खर्च वाढणार आणि प्रभागात फूट पडू शकते,Rajgurunagar
से म्हणत गावकऱ्यांनी निवडणूकच बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोणताही उमेदवार स्वखुशीने माघार घेण्यास तयार नसल्याने चर्चा अडकली. अखेर लिलाव करण्याचा तोडगा काढण्यात आला. गावातील मंदिरात सर्व उमेदवार व ग्रामस्थांना बोलावण्यात आले आणि तिथेच दोन्ही पदांसाठी बोली लावण्यात आली. सर्वसाधारण जागेसाठी कोटीच्या पुढे बोली गेली. महिला जागेसाठी 22 लाख रुपयांवर बोली थांबली. बोलीतून जमा होणारा निधी प्रभागाच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सर्वोच्च बोली लावणारे उमेदवार आता या प्रभागाचे नगरसेवक आणि नगरसेविका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्यासाठी इतर उमेदवारांनी माघार घेणे आवश्यक आहे.
नागरिक हे गावाच्या विकासासाठी घेतलेला सकारात्मक निर्णय मानत आहेत; तर दुसरीकडे, निवडणूक प्रक्रिया पैशाच्या जोरावर चालू लागली तर लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांवर घाला बसेल, असे मत विरोधक मांडत आहेत.
There is a huge auction for the post of corporator in Rajgurunagar!
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















