विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : Jayakumar Gore सांगाेला नगर परिषद निवडणुकीच्या निमि्ताने साेलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री व भाजप नेते जयकुमार गाेरे आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. यामागचे कारण सांगताना जयकुमार गाेरे म्हणाले,आज शरद पवारांचा पक्ष दिसत नाही, मशाल कोठेच दिसत नाही, पंजा गायब आहे. अशावेळी आमच्या आमच्यातच लढायची वेळ येते. विरोधकच नसले तर आम्ही आपल्यातच लढून घेऊ.Jayakumar Gore
सांगोला नगरपालिका निवडणुकीत स्थानिक राजकारण तापले असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीतील संबंधांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सांगोला शहरात होत असलेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी येणार असल्याच्या चर्चेत त्यांनी म्हटले की, ते आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. ते त्यांच्या पक्षासाठी मतं मागतील, आम्ही आमच्या पक्षासाठी मतं मागू. जिथे युतीने एकत्र उमेदवार उभे केले आहेत, तिथे नक्कीच आम्ही एकत्रितपणे मतांची विनंती करू. राजकीय ताणतणावांनंतरही महायुतीतील दोन्ही पक्षांनी कमीतकमी औपचारिक पातळीवरील सुसंवाद कायम असल्याचं चित्र दिसून आलं आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी स्वतः शिंदेंची सभा आयोजित केल्याने या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.Jayakumar Gore
पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका करताना गाेरे म्हणाले की, मी पालकमंत्री झाल्यापासून बापूंनी एकदाही युतीसंदर्भात माझ्याशी चर्चा केलेली नाही. एकदा भेट झाली तेव्हा त्यांनी सांगोला येथे मैत्रीपूर्ण लढत करू अशी भावना व्यक्त केली होती. पण त्यानंतर कोणत्याही चर्चेला ते पुढे आले नाहीत. तरीही स्वतः आणि बापू यांच्यात वैयक्तिक नातेसंबंध चांगले आहेत. बापू आमचे सहकारीच आहेत; स्थानिक परिस्थितीमुळे ते व्यथित झाले असतील पण निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा एकत्र असू,
महायुतीतील दोन्ही पक्षांमध्ये सहयोगापेक्षा स्पर्धा अधिक वाढताना दिसत असली तरी निवडणुकीनंतर परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत गोरे यांनी दिले. त्यामुळे सांगोला नगरपालिका निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता राज्याच्या महायुतीतील राजकीय नातेसंबंधांवरही प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता आहे.
Since there are no opponents, it’s time for us to fight among ourselves, as Jayakumar Gore says, so let’s say it’s the Shinde faction against the BJP!
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















