भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले अशा लोकांच्या हाती तुम्ही सत्ता का देता? अजित पवार यांचा सवाल

भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले अशा लोकांच्या हाती तुम्ही सत्ता का देता? अजित पवार यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

बीड : अनेक योजनांमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले अशा लोकांच्या हाती तुम्ही सत्ता का देता? चांगल्या लोकांना निवडून का देत नाही? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडकरांना विचारला. Ajit Pawar

बीड नगरपालिकेसाठी 35 वर्ष तुम्ही क्षीरसागरांना संधी दिली, मला फक्त पाच वर्षे संधी द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये झालेल्या सभेतून केलं. बीडच्या विकासासाठी अजित पवार जीवाचं रान करेल, चांगली संधी तुम्हाला चालून आली आहे अशी साद अजितदादांनी बीडकरांना घातली. Ajit Pawar

बीड शहर जिल्ह्याचे ठिकाण अनेक वर्षांपासून एका घराण्याची मक्तेदारी आहे. त्यातूनच कोणीतरी नगराध्यक्ष व्हायचा. मात्र बारामतीच्या धरतीवर बीडचा विकास करू असा शब्द मी देतो. बीडमध्ये कुणाचीही दहशत खपवून घेतली जाणार, असा इशारा अजित पवार यांनी दिला.



अजित पवारांनी योगेश क्षीरसागरांवर जोरदार टीका केली. 53 उमेदवार निवडणुकीसाठी उभे करण्यासाठी मला एबी फॉर्म द्या अशी मागणी करण्यात आली. मात्र पक्ष तुमच्या काकाचा आहे का? असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित करत क्षीरसागरांवर निशाणा साधला. उमेदवारी देताना चार चौघांशी चर्चा करावी लागते, शंका आली तर पोलिसांकडून रिपोर्ट मागवतो. आता आम्ही दिलेले उमेदवार कुठे चुकले तर मला विचारायचं असं अजित पवार म्हणाले.

मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तेव्हा पाहिले की सर्वत्र रस्त्यांवर खड्डेच खड्डे होते. तुम्ही असल्या लोकांच्या हातात कशी सूत्रं देता? चांगल्या लोकांच्या हातात सत्ता का देत नाही? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे या नायब तहसीलदार आहेत, त्यांना एकदा संधी द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

बीड शहर रोजच्या रोज झाडले जात नाही. आठ दहा दिवसांनी पाणी मिळते, असल्या लोकांच्या पाठीशी तुम्ही होता. भ्रष्टाचाराने पोखरलेलं आणि जाऊ तिथे खाऊ असे वेगळेच राजकारण आहे. या लोकानी बीडचं वाटोळं केलं. पाणीपुरवठ्याच्या योजना आणल्या, त्यात देखील भ्रष्टाचार केला. त्या चांगल्या केल्या असत्या तर बीडकराना पाणी मिळालं असतं. ज्यांच्या हातात बीडची सूत्रं त्यांनी त्याचे वाटोळे केलं. पण मी आता ही परिस्थिती बदलणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.

Why do you give power to people who have committed corruption and embezzled money? Ajit Pawar questions

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023