विशेष प्रतिनिधी
बीड: परळीतील प्रचार सभेत भावनिक होत वाल्मीक कराडची आठवण काढल्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. असा माणूस जर कुणाला आठवत असेल तर त्याच्याइतका नीच माणूस नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या गंभीर प्रकरणाशी संबंधित व्यक्तीची कमतरता भासते असे सांगणारे नेते जनतेसमोर कोणते मूल्य ठेवत आहेत, असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.
धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची त्यांनी सभेत आठवण काढली. आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही, याची जाणीव होते, असे मुंडे म्हणाल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा अर्थ, त्यामागील संकेत आणि ते कोणाच्या संदर्भात बोलत होते, याबाबत चर्चा रंगली आहे.
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून जरांगे म्हणाले की, गुंडगिरी, जमिनी बळकावणे, लोकांना त्रास देणे, टोळ्या वाढवणे अशी कामे करणाऱ्या व्यक्तीचे समर्थन कुणी करीत असेल तर त्यांच्यावर जनतेचा विश्वास कसा ठेवायचा? त्यांच्या मते, राजकारणात येणारे लोक जनतेसाठी आदर्श असावेत, पण काही नेत्यांच्या वागणुकीमुळे हा आदर्श कोसळतो आहे.
मनोज जरांगे नेत्यांना आवाहन करताना म्हणाले, आता तरी डोळे उघडा. समाजात गुन्हेगारी वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे राजकीय पाठींबा. जर अशा व्यक्तींना संरक्षण मिळत राहिले तर सामान्य लोकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. गोरगरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या नेत्यांनी सावध झाले नाही तर त्यांचीही राजकीय ओळख या पापात जळून जाईल.
जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट धनंजय मुंडेंना विचारले की, माझ्या प्रकरणात तुम्ही तयार असाल तर चला, दोघांनीही नर्को टेस्ट करू. या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आता या वादाची दिशा कोणत्या दिशेने जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय संघर्ष, आरोप-प्रत्यारोप, नैतिक प्रश्न आणि जनतेतील अस्वस्थता यांनी या प्रकरणाचा धुरळा अजूनच दाट केला आहे. परळीतील एका विधानाने सुरुवात झालेला हा वाद आता राज्य राजकारणातील चर्चेचे प्रमुख केंद्र बनला आहे.
There is no man as vile as him, Manoj Jarange harshly criticizes Dhananjay Munde for recalling Valmik Karad
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















