Mumbai : मुंबईतील प्रारूप मतदार यादीचा घोळ, 11 लाख 1 हजार 505 नावे ही दुबार

Mumbai : मुंबईतील प्रारूप मतदार यादीचा घोळ, 11 लाख 1 हजार 505 नावे ही दुबार

Mumbai

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mumbai  मुंबई महापालिका निवडणूक प्रारूप मतदार यादीतील दुबार मतदारांचा घोळ काही सुटलेला दिसत नाही. महापालिका 1 जुलै 2025 रोजीपर्यंत नोंदविण्यात आलेल्या मतदारांच्या यादीनुसार मतदान घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार एकूण मतदारांची संख्या ही 1 कोटी 3 लाख 43 हजार 216 एवढी नोंदवण्यात आलेली आहे. मात्र या यादीत तब्बल 11 लाख 1 हजार 505 नावे ही दुबार आहेत. 4 लाख 33 हजार मतदारांची नावे ही अनेकदा नोंदवण्यात आलेली आहेत. एकाच व्यक्तीचे नाव तब्बल 103 वेळा नोंदविण्यात आल्याचा जागतिक विक्रम झाला आहे.Mumbai

दुबार नावे वगळण्याची मागणी विरोधी पक्षांनी वारंवार लावून धरली आहे. सुधारित मतदार यादी तयार करून मगच निवडणूक घ्यावी, अन्यथा निवडणूक घेऊ नये, अशा शब्दांत विरोधकांनी निवडणूक आयोगाला सुनावले आहे.Mumbai



 

दुसरीकडे दुबार मतदारांबाबत मुंबई महापालिका आयुक्तांकडे तक्रार करावी आणि त्यांच्याकडे दाद मागावी, असे सांगत निवडणूक आयोगाने हात वर केला आहे. मात्र मुंबई महापालिकेने निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर ऐवजी 20 नोव्हेंबरला पाठवली असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुबार मतदारांमुळे मोठा पेचप्रसंग ओढवला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रारूप मतदारयादीत एकूण मतदारांची संख्या 1 कोटी 3 लाख 43 हजार 216 इतकी नोंदविण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात 4 लाख 33 हजार दुबार मतदारांमुळे ही संख्या वाढली असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे दुबार मतदारांची नावे वगळली गेल्यास प्रत्यक्षात मतदारांची संख्या ही 99 लाख 10 हजारावर येण्याची शक्यता आहे.

2012 च्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 1 कोटी 2 लाख 86 हजार 579 एवढी होती. त्यामध्ये , पुरुष मतदारांची संख्या 57 लाख 20 हजार 306 एवढी होती. तर महिला मतदारांची संख्या 45 लाख 66 हजार 273 एवढी होती.

2017 च्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 91 लाख 80 हजार 497 एवढी होती. त्यामध्ये , पुरुष मतदारांची संख्या 50 लाख 30 हजार 363 एवढी होती. तर महिला मतदारांची संख्या 41 लाख 49 हजार 753 आणि इतर 381 एवढी होती.

2025 च्या निवडणुकीत प्रारूप मतदारयादीत एकूण मतदारांची संख्या 1 कोटी 03 लाख 43 हजार 216 एवढी दर्शविण्यात त्यामध्ये , पुरुष मतदारांची संख्या 55 लाख 16 हजार 707 एवढी असून महिला मतदारांची संख्या 48 लाख 26 हजार 509 आणि इतर 1099 एवढी दर्शविण्यात आली आहे.

Mumbai draft voter list messed up, 11 lakh 1 thousand 505 names duplicated

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023