जातीच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मतांमधून जागा दाखवा, नाना पाटेकर यांचे आवाहन

जातीच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मतांमधून जागा दाखवा, नाना पाटेकर यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर: सध्या देशात सुरू असलेले जातीपातीचे राजकारण पाहून जीव गुदमरतोय. जातीच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मतांमधून जागा दाखवा,” असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी तरुणांना केले. Nana Patekar

छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात आयोजित ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’च्या ३९ व्या आंतर-विद्यापीठीय युवा महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील राजकीय परिस्थिती आणि सैनिकांची स्थिती यावर मनमोकळे भाष्य केले. Nana Patekar

सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना नाना म्हणाले की, “आजूबाजूचे वातावरण पाहून खूप अस्वस्थ व्हायला होते, अक्षरशः दम गुदमरल्यासारखे वाटते. काही राजकारणी केवळ जातीपातीचे राजकारण करत आहेत. ‘तू अमुक जातीचा, तू तमुक जातीचा’ असे सांगून लोकांमध्ये भेद निर्माण केले जात आहेत. मी स्वतः कधीही जात मानली नाही, पण आज दुर्दैवाने जातीचेच राजकारण जोरात सुरू आहे.” Nana Patekar



यावेळी नाना पाटेकर यांनी तरुणाईला सतर्क राहण्याचा सल्ला दिला. जातीपातीचे राजकारण कोण करतंय आणि कसं करतंय, हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे केवळ कोणाच्या तरी सभेतील गर्दीचा भाग होऊ नका, असे ते म्हणाले. देशात बदल घडवण्याची ताकद तुमच्यात आहे. जातीचे राजकारण करणाऱ्यांना तुमच्या मतदानातून चोख उत्तर द्या, असे आवाहन नाना पाटेकर यांनी मतदारांना केले.

आपल्या भाषणात नाना पाटेकर यांनी सैनिकांच्या सन्मानाचा मुद्दा अतिशय भावुक होऊन मांडला. ‘प्रहार’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, मी ‘प्रहार’च्या वेळी 3 वर्षे सैनिकांसोबत सीमेवर राहिलो आहे. तिथे ऊन-पावसाचा विचार न करता तरुण मुले हातात रायफल घेऊन निधड्या छातीने उभी असतात. ते आपल्यासाठी तिथे मरायला तयार असतात, पण आपल्या देशात त्यांना हवा तसा सन्मान मिळत नाही, याची मला प्रचंड खंत वाटते.

नाना पाटेकर म्हणाले, बाहेरच्या देशात एखादा सैनिक समोर आला तर स्वतः राष्ट्राध्यक्षही उभे राहून त्यांना सॅल्युट करतात. आपल्याकडे मात्र तशी संस्कृती दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Show Them Their Place at the Ballot Box,” Nana Patekar Tells Voters on Caste Politics

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023