विशेष प्रतिनिधी
अकोट: सभेत बोलताना एखादा शब्द चुकीचा निघू शकतो, पण त्या शब्दाने लोकांची भावना दुखावली असेल तर त्याबद्दल क्षमा मागणे माझे कर्तव्य आहे, असे म्हणत भिकारपणा हा शब्द वापरल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये घेतलेल्या सभेत अंबाजोगाई येथे जीभ घसरल्याने झालेल्या वादावर माफी मागितली. Ajit Pawar
अजित पवारांनी स्पष्ट केले की, अंबाजोगाई येथे मी जे बोललो ते शहरातील अस्वच्छतेविरोधात होते. मात्र, वापरलेला शब्द योग्य नव्हता, हे मला जाणवले. माध्यमांनी त्या शब्दाचा मुद्दा मोठा केला, पण ती चूक माझीच होती. मी चुकीचा शब्द वापरला, भिकारपणा. तो शब्द माझ्याकडून निघायला नको होता. त्याबद्दल मी जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करतो.
अजित पवार म्हणाले, लोक म्हणतात मी कडक बोलतो. पण मी कडक नाही, कामसू आहे. सकाळी सहा वाजता मी कामात झोकून देतो. कामाचा माणूस असल्यामुळेच जनता मला पुन्हा पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून देते. विरोधक टीव्हीवर काय दाखवतात यावर लक्ष देतात; पण मला टीआरपीमध्ये नव्हे, तर जनतेच्या विकासात रस आहे. कामगिरी हीच माझी भाषा आणि त्यावरच जनतेचा विश्वास आहे.
भ्रष्टाचार आणि गुत्तेदारी यावर प्रहार करताना अजित पवार म्हणाले, राजकारण करायचे तर पारदर्शकपणे करा. गुत्तेदारी करायची असेल तर राजकारणात पाऊल टाकू नका. नगराध्यक्ष पदावर असलेल्यांच्या घरातील व्यक्तीच ठेके घेत असल्याची प्रथा वाढली आहे, त्यामुळे विकासकामांचा दर्जा खाली येतो आणि नागरिकांची फसवणूक होते. जनतेच्या पैशात डल्ला मारून राजकारण करणाऱ्यांना आम्ही उघडे पाडू.
Ajit Pawar Demands Public Apology After Uproar Over Use of the Word ‘Bhikarapana’
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















