नीलेश राणेंचे ‘स्टिंग ऑपरेशन’, पैसे वाटल्याच्या संशयावरून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड

नीलेश राणेंचे ‘स्टिंग ऑपरेशन’, पैसे वाटल्याच्या संशयावरून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड

विशेष प्रतिनिधी

कणकवली : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना (शिंदे गट) नेते नीलेश राणे यांनी मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटल्याच्या संशयावरून थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड घालत केलेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे खळबळ उडाली आहे. राणे यांनी घरातून पैशांनी भरलेली बॅग सापडल्याचा दावा करत व्हिडिओही व्हायरल केला आहे. Nilesh Rane

निवडणुकीसाठी प्रचार रंगात असताना, मालवण परिसरात पैसे वाटप सुरू असल्याची माहिती नीलेश राणे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी थेट भाजप कार्यकर्ता विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन तपास सुरू केला. या ठिकाणी पैशांची एक बॅग आढळल्याचा दावा राणे यांनी केला. “ही एकच बॅग नाही, अजून तीन ते चार बॅगा असल्याची माहिती आहे,” असे आरोप त्यांनी केले आहेत.राणे यांनी या कारवाईचे चित्रीकरण करत ते सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. Nilesh Rane

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक अधिकारी आणि पोलिस पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आढळलेल्या रोकड रकमेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. Nilesh Rane



नीलेश राणे म्हणाले, “आम्ही पैशांना हातही लावलेला नाही. चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पैसे वाटप सुरू असल्याची माहिती आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी हे पैसे ताब्यात घेऊन सखोल तपास करावा.”

या प्रकरणावर भाजपची प्रतिक्रिया आली आहे. संबंधित कार्यकर्त्याने म्हटले आहे की, “ही रोकड मतदारांसाठी नसून माझ्या व्यवसायाशी संबंधित आहे.”

भाजप नेते आशिष शेलार यांनी राणे यांचे आरोप खोडून काढत,“ही माहिती चुकीची असून आरोप निराधार आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप राज्यात सत्तेत असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष आमनेसामने लढताना दिसत आहेत. मालवणमधील या घटनेमुळे स्थानिक स्तरावर महायुतीत तणाव वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

२ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी असताना, या प्रकरणाचा मतदानावर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nilesh Rane Conducts ‘Sting Operation’, Raids BJP Worker’s Home Over Cash-for-Votes Suspicion

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023