विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत असताना राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २०२५ मध्ये तयार होणाऱ्या मतदार याद्यांच्या कार्यक्रमात फेरबदल करून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या बदलानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत ३ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर होती.
मतदार याद्या तयार करताना तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी येऊ नयेत यासाठी आयोगाने हेल्पलाईन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तांत्रिक अडचणींसाठी ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक परिस्थितीत आयोगाच्या संगणकीकरण कक्षातील अधिकारी समीर गंदपवार यांच्याशी (022-22886950 / 22012290) संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महानगरपालिका निवडणुका गेली काही वर्षे प्रलंबित असल्या तरी निवडणूक आयोगाच्या या ताज्या पत्रामुळे प्रशासकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मतदार यादीविषयी सर्व माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर — mahasec.maharashtra.gov.in — उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वाढीव मुदतीमुळे नागरिकांना आपले नाव, पत्ता किंवा अन्य तपशील तपासून दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध झाला आहे.
१० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर महानगरपालिका निवडणुकांचे वास्तव स्वरूप अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सुधारित कार्यक्रमामुळे अधिकारीवर्गाने दिलासा व्यक्त केला असला तरी वेळेच्या मर्यादेत अचूक काम पूर्ण करण्याचे आव्हान कायम आहे.
सुधारित वेळापत्रक
१. हरकती व सूचना दाखल करणे
नवीन अंतिम तारीख: ३ डिसेंबर २०२५
(पूर्वीची तारीख: २७ नोव्हेंबर)
२. अंतिम मतदार यादी जाहीर
अंतिम यादीची घोषणा: १० डिसेंबर २०२५
(पूर्वीची तारीख: ५ डिसेंबर)
३. मतदान केंद्रांची यादी
जाहीर तारीख: १५ डिसेंबर २०२५
(पूर्वीची तारीख: ८ डिसेंबर)
४. केंद्रनिहाय मतदार यादी
जाहीर तारीख: २२ डिसेंबर २०२५
(पूर्वीची तारीख: १२ डिसेंबर)
Municipal Elections: Deadline Extended for Objections to Voter Lists, Says State Election Commission
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर



















