विशेष प्रतिनिधी
पुणे : Sachin Ahir कॉंग्रेस नेत्यांना मनसे आंदोलनात चालते, मनसे रस्त्यावर उतरायला चालते, मग महाविकास आघाडीत का चालत नाही, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी केला आहे. Sachin Ahir
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( मनसे ) महाविकास आघाडीतील समावेशावरून आघाडीमध्ये मतभेद आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी मनसेच्या समावेशाला विरोध दर्शवला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अहिर म्हणाले, मत चोरीचा नारा राहुल गांधी यांनी दिला. त्या भूमीकेला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चात मनसे पक्ष सहभागी झाला. रस्त्यावर उतरला, मनसे आंदोलनात चालतो, मग महाविकास आघाडीत कसा चालत नाही? आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही केवळ मनसेच नाही तर रिपाइं, वंचित व इतर पक्षांनाही बरोबर घेण्यास तयार आहे. Sachin Ahir
अहिर म्हणाले, महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये निवडणुकीत लढाई सुरू आहे. भाजपने स्वार्थासाठी पक्ष फोडले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. काही वर्षांपूर्वी शिवसेनेतील एक गट एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेला. तर, बच्चू कडू, उदय सामंत या सारखे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नंतर तिकडे गेले. जाण्यापूर्वी सामंत शिवसेना कार्यालयात येऊन नाश्ता करून गेले. आता सामंत आमच्याकडे जरी आले नाहीत. तरी पण ते दुसरीकडे कुठे जाणार नाहीत, असे होणार नाही.
मनसेने लोकसभा निवडणूकीत भाजप व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यानंतर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली. मात्र, या निवडणूकीत मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तेव्हापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईव्हीएम मशिनमुळे आपल्या पक्षाचा पराभव झाल्याची भूमिका जाहीरपणे मांडत आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र व इतर राज्यांच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतचोरी झाली, याचे प्रात्यक्षिक करून सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. राहुल गांधी यांच्या या भूमीकेला पाठिंबा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होत आक्रमक भाषण केल. यानंतर मनसे पक्षाच्या महाविकास आघाडीतील समावेशाची चर्चा सुरू झाली. मात्र, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांसंदर्भात असलेल्या भूमिकेमुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काही नेत्यांनी मनसेच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.
Why Is It Allowed in the MNS Agitation but Not in the Maha Vikas Aghadi, Sachin Ahir Questions
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर



















