BJP MLA : भाजप आमदाराने ५० खोके एकदम ओके घाेषणेला पुन्हा दिली हवा

BJP MLA : भाजप आमदाराने ५० खोके एकदम ओके घाेषणेला पुन्हा दिली हवा

विशेष प्रतिनिधी

हिंगोली : शिवसेना फुटीच्या वेळी गाजलेली ५० खोके एकदम ओके ही विरोधकांची घोषणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिवसेना शिंदे गटाचा मित्र असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारानेच ही घाेषणा सत्य असल्याचे म्हटले आहे.


भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी


एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतल्यानंतर बहुतांश आमदार शिंदेंसोबत गेले. या आमदारांना प्रत्येकी ५० कोटी दिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात कुरघोडी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी ५० खोकेची घटना हे सत्य असल्याचा दावा केला आहे.
संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेंकडे जाण्यासाठी ५० कोटी घेतले असं विधान भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारले असता आमदार मुटकुळे म्हणाले की, मी केलेले विधान गंभीर असले तरी ते खरे आहे. मला इतरांचे माहिती नाही, परंतु संतोष बांगर यांना ५० कोटी मिळाले हे माहिती आहे. आदल्या दिवसापर्यंत ते रस्त्यावर उतरून लोकांना ठाकरेंसोबतच राहण्याचं सांगत होते, परंतु अचानक त्यांना स्वप्न पडलं आणि ते ५० कोटी घेऊन पळाले. एकनाथ शिंदेंच्या माणसाकडून ते पैसे बांगर यांना मिळाले .
भाजप आणि शिंदेसेना हिंगोली जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. शिवसेना शिंदे गटाने भाजपाचे दोन उमेदवार फोडून भाजपाला धक्का दिला. हिंगोलीच्या नगराध्यक्षपदाच्या जागेवर भाजपचा दावा सांगितला जात असताना आमदार संतोष बांगर यांनी येथील निवडणुकीत उडी घेऊन नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे केले. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेत सुरुवातीपासूनच वादाची ठिणगी पडली. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांच्यात अनेक वेळा आरोप-प्रत्यारोप झाले.

BJP MLA Revives ‘50 Khoke, Ekdum OK’ Slogan, Sparks Fresh Political Storm

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023