विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दाेन चुलत बंधुंच्या भेटीचा सिलसिला वाढला आहे. गुरूवारी उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. मात्र, यावेळी दाेन्ही पक्षांचे काेणीही नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे ही भेट राजकीय हाेती की काैटुंबिक हा प्रश्न आहे. Uddhav-Raj meet
मात्र, राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी अचानक भेट घेतली. ही भेट सुमारे सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास झाली. उद्धव ठाकरे हे कोणतीही मोठी टीम किंवा नेत्यांना न घेता, एकटेच या भेटीसाठी पोहोचले. त्यामुळे या भेटीचे महत्त्व अधिक वाढले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आगामी निवडणुकीची रणनीती, राजकीय वातावरणातील बदल आणि एकत्रितपणे लढण्याच्या शक्यतांवर चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. Uddhav-Raj meet
महाराष्ट्रातील राजकारणात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनली आहे. सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. मात्र, या आघाडीत मनसेलादेखील सामील करण्याचे प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याबाबत सकारात्मक भाव दाखवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विस्तार करण्यासाठी आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी मनसेची मदत घेण्याचे धोरण आखले जात असल्याचे चित्र आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्याला उत्तर म्हणून ही नवी युती महत्त्वाची ठरू शकते. Uddhav-Raj meet
शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वातावरणाला नवा वेग आला आहे. एकेकाळी शिवसेनेच्या एका मंचावरून राज्यातल्या मराठी आणि हिंदुत्व राजकारणासाठी एकत्र आवाज उठवणारे ठाकरे बंधू, मागील दशकभरापासून वेगवेगळ्या राजकीय मार्गांनी पुढे गेले. आता पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, कोणते निर्णय झाले याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही, राजकीय गणितात काहीही अशक्य नाही, हे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्यातील राजकारणात नक्कीच नवे समीकरण तयार होऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
227 जागा असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला महत्त्वाच्या जागा हव्या आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे सेनेतील नेते आणि मनसेतील नेते यांच्यात चर्चेची एक फेरी झाल्याचे समजते. पण त्यात काही जागांवरून मतभिन्नता दिसून आली. काही जागांवर दोन्ही पक्ष आग्रही असल्याने तिढा निर्माण झाला. या बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नसल्याचे समजते. त्यानंतर जागा वाटपात पेच निर्माण झाल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मनसे आणि उद्धव सेना यांच्यात 75 जागांवर खलबतं सुरू असून त्यावर तोडगा काढण्याची कसरत करावी लागणार असल्याचे समजते.
Uddhav-Raj meet again, discussion on election strategy or family meeting?
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर



















