काॅंग्रेसची परदेशातून भारताविरुध्द साेशल मीडियावर माेहीम, संबित पात्रा यांचा आराेप

काॅंग्रेसची परदेशातून भारताविरुध्द साेशल मीडियावर माेहीम, संबित पात्रा यांचा आराेप

Sambit Patra

 

नवी दिल्ली : काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीशी संलग्न असलेले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स पाकिस्तान, बांग्लादेश आणि आग्नेय आशियातील देशांत बसून भारताविरुद्ध प्रचार मोहीम राबवत आहेत, असा आराेप भारतीय जनता पक्षाचे खासदार संबित पात्रा यांनी केला आहे. एक्स (माजी ट्विटर) प्लॅटफॉर्मवरील लोकेशन फीचरच्या आधारे त्यांनी हे उघड केले की, काही काँग्रेस नेते आणि राज्यस्तरीय काँग्रेस अकाउंट्स भारताबाहेरुन ऑपरेट होत आहेत. Sambit Patra

संबित पात्रा म्हणाले, पवन खेडा यांचे अकाउंट अमेरिका बेस्ड दाखवत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अकाउंट आयर्लंडशी जोडलेले दिसले, नंतर ते भारतात बदलण्यात आले. हिमाचल प्रदेश काँग्रेसचे अकाउंट थायलंडशी संबंधित आहे. 2014 नंतर काँग्रेस आणि डाव्या गटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि भारताचा अपमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. Sambit Patra

भारताविरोधी मोहीम विदेशातूनच राबवली जातेपात्रांनी पुढे म्हटले की, अनेक डावे व काँग्रेस समर्थक इन्फ्लुएंसर्स विदेशातून भारतविरोधी अजेंडा चालवत आहेत. काँग्रेसचे काम देशाला विभागणे आहे, त्यामुळेच ते विदेशातील लोकांशी हातमिळवणी करून भारताविरुद्ध वातावरण तयार करत आहेत.

पात्रांनी असाही आरोप केला की, हे अकाउंट्स भारताच्या संवैधानिक संस्थांची बदनामी करत आहेत आणि निवडणूक आयोगासह इतर संस्थांवर आपत्तिजनक टिप्पणी करत आहेत.तीन प्रकारचे कथित नैरेटिव्ह तयारत्यांच्या मते परदेशातील काही अकाउंट्सद्वारे भारतात तीन कथित नरेटिव्ह पसरवले जात आहेत. यात वोट चोरीचे नरेटिव्ह, ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पीएम मोदी यांना कमजोर दाखवण्याचा प्रयत्न आणि संघासह पंतप्रधानांवर सतत डिजिटल हल्ले. हा एक संघटित सायबर कट आहे.

पात्रांनी यावेळी काही अकाउंट्सबद्दल सांगितले. अर्पित शर्मा नावाच्या एका यूरोप-बेस्ड अकाउंटने व्होट चोरीचा आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. एक सिंगापूर-बेस्ड अकाउंट निवडणूक आयोगावर अपमानास्पद पोस्ट टाकल्याचा दावाही त्यांनी केला.

Congress’s social media campaign against India from abroad, Sambit Patra alleges

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023