Vijay Wadettiwar : नागपूर स्फोट प्रकरणी दोषींना भरचौकात फाशी द्या, विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नागपूरमधील एका कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाच्या प्रकरणातील दोषींवर खुनाचा (कलम 302गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दोषींना भरचौकात फाशी द्या, अशी मागणी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, स्फोट झालेल्या कंपनीत सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती. दोन सुरक्षा अधिकारी असणे अनिवार्य असताना तिथे केवळ एकच अधिकारी होता. तसेच, त्या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी तैनात नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही त्या ठिकाणी नव्हते. अशा परिस्थितीत कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू होता, असा आरोप त्यांनी केला. Vijay Wadettiwar

या घटनेनंतर दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये केवळ कलम 105, 125-ए, 125-बी आणि 288 चा वापर करण्यात आला आहे. मात्र, जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे याला केवळ अपघात न मानता ‘हत्या’ मानले जावे. संबंधित कंपनी मालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार गुन्हा दाखल व्हावा. संबंधित सरकारी अधिकारी तिथे काय करत होते आणि त्यांनी या त्रुटींकडे दुर्लक्ष का केले, याचीही चौकशी व्हावी. Vijay Wadettiwar



एका दिवसात जामीन मिळेल अशी सौम्य कलमे लावून सरकार नेमके कोणाला वाचवत आहे? असा सवाल करत विजय वडेट्टीवार म्हणाले, 22 लोकांचा बळी गेला असतानाही कलम 302 लावण्यास आणि सखोल चौकशी करण्यास मंत्री महोदय का कचरत आहेत? पोलिसांनी लावलेली कलमे इतकी कमकुवत आहेत की, आरोपींना एका दिवसात जामीन मिळेल. हा मृतांच्या नातेवाईकांशी केलेला क्रूर थट्टा आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, या कंपनीचे शेवटचे निरीक्षण कोणत्या अधिकाऱ्याने केले होते? त्याचे नाव समोर आले पाहिजे. त्या निरीक्षकाने तपासणीत कोणत्या त्रुटी नोंदवल्या होत्या? त्या त्रुटींची पूर्तता कंपनीने केली होती का? आणि नसेल केली, तर कंपनी सुरू ठेवण्याची परवानगी कोणी दिली? ज्या अधिकाऱ्यांनी डोळे मिटून या असुरक्षित कंपनीला परवानगी दिली, त्या नालायक अधिकाऱ्यांवर सर्वात आधी कठोर कारवाई झाली पाहिजे. Vijay Wadettiwar

यावर मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, नागपूर कंपनी स्फोट प्रकरणातील आरोपीला जामीन होऊ नये म्हणून कलमं लावताना पोलिस आयुक्तांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रकरणात राजकारण करू नका. सरकार कुणालाही पाठिशी घालत नाही.

Hang the Nagpur Blast Convicts in a Public Square, Demands Vijay Wadettiwar in Assembly

महत्वाच्या बातम्या