विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray आम्ही मोबाईलमध्ये अडकलो आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय झाले? महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचे कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हे कर्ज 2 लाख कोटी होते. महाराष्ट्रातील प्रत्येक शहर बघा. त्याला ना आकार ना ऊकार आहे. कोणीही कुठेही इमारती बांधत आहेत. कोणालाही कसल्याही परवानग्या दिल्या जातात. तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवर व्यक्त करता असा संताप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.Raj Thackeray
आज शहरे कोलमडून पडली आहेत. मी मध्यंतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. शहरात ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. तरुण शेती करायला नको म्हणत आहेत. शहरात यायचे म्हणतात. शहराला ना आकार ना उकार राहिला आहे. कोणालाही कसल्याही परवानग्या दिल्या जात आहेत. तुम्ही पाहता आणि राग मोबाईलवर व्यक्त करत आहेत. तुम्ही रस्त्यावर येता कामा नये, तुम्ही असेच सडा, मरा हे त्यांना हवे आहे.” असे म्हणत त्यांनी इशारा दिला. पहिल्यांदा मोबाईलच्या इन्स्टाग्रामधून बाहेर या, असा सल्ला राज ठाकरेंनी यावेळी दिला.Raj Thackeray
राज ठाकरे म्हणाले की, “आजपर्यंत तीनवेळा शेतकरी कर्जमाफी झाली. आज राज्यात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. तुमच्यासाठी कोस्टल रोड करत आहेत. तो रस्ता तुमच्यासाठी झाला नाही बाकीच्यांना आत येण्यासाठी झाला आहे.” असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. “अदानीसारखे उद्योगपती जमिनी घेत आहेत. आपण महाराष्ट्राची ओळख गमावून बसत आहोत. आपण भाषा गमावून बसत आहोत. हातातून गेलेली गोष्ट परत येणार नाही. भाषा संपली की अनेक देश जगातून सपंले आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, “आज देशातही धाकधूक आहे. गॅसचा प्रश्न निर्माण झाला आहे. नॉर्मल असणारेही गॅसवर आहेत. आपल्या पंतप्रधानांकडूनही काही गोष्टी राहून गेल्या. जो इराण इतकी वर्ष साथ देत होता, त्यावर ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत. आपण इराणला साथ द्यायला हवी होती. या देशात येणारे बरेचसे तेल इराणमधून येते.”
जम्मू काश्मीरच्या वेळीही इराणने आपल्याला पाठिंबा दिला. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलो नाही याचा भविष्यात त्रास होणार आहे.” असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली. “नेमके आपण कुठे चाललो आहोत? हेच समजत नाही. या देशातील राज्यं कुठे चालली आहेत. प्रगती कुठे होत आहे?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Maharashtra’s Situation Worsens While We Remain Stuck on Mobile Phones, Raj Thackeray Expresses Anger
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास