CM Fadanvis : विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे धागेदोरे माझ्याकडे, अशोक खरात प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

नागपूर : CM Fadanvis विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे धागेदोरे माझ्याकडे आहेत. पुराव्यांची फेकाफेक करण्यापेक्षा ते पोलिसांना द्या. महिलांना न्याय मिळवून देणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.CM Fadanvis

बहुचर्चित अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा देताना म्हणाले की, केवळ कोणासोबत फोटो आहे म्हणून मंत्र्यांवर आरोप करणे चुकीचे आहे. तपासात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही, मात्र पुराव्याशिवाय मंत्र्यांची बदनामी सहन केली जाणार नाही.CM Fadanvis



मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास सुरू असून दररोज त्याचे मॉनिटरिंग केले जात आहे. “मी स्वतः पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. नाशिक पोलीस आणि एसआयटी प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते थेट पोलिसांकडे द्यावेत,” असे आवाहन त्यांनी केले.

विरोधकांवर पलटवार

विरोधकांवर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, “विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे धागेदोरे माझ्याकडे आहेत. मग ते पुढे का येत नाहीत?” तसेच केवळ निवडक मंत्र्यांवर आरोप करून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता फडणवीस यांनी टीका करत म्हटले की, “४० किलोमीटरवरून पाणीपुरवठा करताना कोणाला झुकते माप दिले गेले, हे आता समोर आले आहे. ज्यांनी हा निर्णय घेतला, त्यांच्यावर काय कारवाई करायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“आम्हाला राजकारणात रस नाही, महिलांच्या सन्मानाची चिंता आहे. पीडित महिलांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला.

I Have Links to Several Opposition Leaders”: CM Fadanvis Warns Over Ashok Kharat Case

महत्वाच्या बातम्या