Manoj Jarange : धनगर समाज एक हाेत असेल तर सहा काेटी मराठा पाठीशी उभा करताे, मनाेज जरांगे यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manoj Jarange  धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एक होऊन येत असाल तर राज्यातील ६ कोटी मराठा समाज तुमच्या पाठीशी उभे करतो, असे आश्वासन मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांनी दिले.Manoj Jarange

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व त्याची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांची जरांगे यांनी मंगळवारी भेट घेतली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देताना जरांगे म्हणाले की, धनगर समाजाने संघटितपणे लढा दिला पाहिजे. सरकारकडे विनंती करा;Manoj Jarange



पण समाजाने एकजूट दाखवली नाही तर न्याय मिळणे कठीण आहे. आरक्षण मिळवायचे असेल आणि ताकद दाखवायची असेल तर धनगर बांधवांनी घरी न थांबता मोठ्या संख्येने मुंबईत यावे. मराठा समाज धनगरांच्या पाठीशी उभा राहील.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व त्याची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांनी १६ मार्चपासून आझाद मैदानावर उपाेषण सुरू केले आहे. मराठा आंदाेलक मनाेज जरांगे, गंगाधर काळकुटे यांच्यासह विविध संस्था संघटनांनी दीपक बाेऱ्हाडे यांच्या आंदाेलनाला पाठिंबा दिला आहे.

If the Dhangar community is united, six crore Marathas will stand behind them, assures Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या