Deepak Kesarkar : खरात प्रकरणात बदनामी केल्यास कोर्टात खेचणार, दीपक केसरकर यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Deepak Kesarkar  अनेक नेत्यांचे खरातसोबतचे फोटो समोर आले आहेत, मात्र केवळ ओळख असणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या कृत्यात सहभागी असणे असा होत नाही, असे म्हणत माजी मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव ओढले गेल्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशाराही दिला आहे. Deepak Kesarkar

खरात प्रकरणाशी आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न हा केवळ राजकीय द्वेषापोटी केला जात असून, यामध्ये ठाकरे गटाचे नेते आघाडीवर असल्याचा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. Deepak Kesarkar

आमदार दीपक केसरकर यांचा नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात संबंध असल्याचा आरोप होत आहे. दीपक केसरकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे काही फोटो देखील समोर आले आहेत. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना, त्यांच्या खात्यातील कारभार हा अशोक खरात याच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. आता दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा समाचार घेतला आहे. Deepak Kesarkar



 

दीपक केसरकर म्हणाले, मी देवभक्त आहे, मी न चुकता शिर्डीला येतो. ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे ते शिर्डीला येण्याच्या वाटेवर आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कुठल्या शिव मंदिरात जायचे? तर मग ईशान्येश्वर मंदिरात जाणे झाले, त्या निमित्ताने ओळख झाली. ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असे नाही. त्यांना वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्यांच्याकडून जे चुकीचे कृत्य घडलेले आहे त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे.
मी कुठलीही पूजा केलेली नाही. मी फक्त ईशान्येश्वरमध्ये एकदा पूजा केली आहे. याच्या पलीकडे मी कुठलीही पूजा त्यांच्या वतीने केलेली नाही. निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणे चुकीचे आहे. इतकी लोकं भेटून गेले, जवळजवळ ३९ आमदार भेटून गेले, मग माझंच नाव का? हा प्रश्न आहे. अनेक लोक भेटायला येतात, त्यामुळे कोणासोबत फोटो काढले म्हणजे तो चुकीचा माणूस आहे असे होत नाही. आपल्या नावाचा वापर करून गैरसमज पसरवू नयेत,” असे दीपक केसरकर म्हणाले.

या प्रकरणाचा संबंध आपल्याशी जोडण्यामागे ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे नेते, विशेषतः संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप करताना केसरकर म्हणाले, ज्यावेळी शिवसेनेत संघर्ष झाला, त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू मांडून विरोधकांचे मनसुबे उधळून लावले होते. त्याचा राग मनात धरून आता माझ्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे,” असे ते म्हणाले. खरातचे कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

दीपक केसरकर यांनी यावेळी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्यांनी खरातच्या मंदिराला पाण्याची लाईन दिली, निधी उपलब्ध करून दिला, तेच लोक आज माझ्यावर बोट दाखवत आहेत. त्यांनी केले तर योग्य आणि आम्ही मंदिरात गेलो तर चुकीचे, हा दुटप्पीपणा आहे,” असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. खरातच्या गुन्ह्यांची कोणतीही माहिती आपल्याला नव्हती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपल्या स्वच्छ प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दीपक केसरकर यांनी कायदेशीर इशारा दिला आहे. “या प्रकरणात एकदा खरातवर आरोपपत्र दाखल झाले की, माझी खोटी बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कोणती कायदेशीर कारवाई करायची, याबाबत मी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे. सार्वजनिक जीवनातील प्रतिमा मलीन करणे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा केसरकर यांनी दिला.

Defamation Over Kharat Case Will Lead to Legal Action, Warns Deepak Kesarkar

महत्वाच्या बातम्या