विशेष प्रतिनिधी
पुणे : Dr. Neelam Gorhe भोंदू मांत्रिक अशोक खरातच्या संदर्भाने सुरू असलेल्या चर्चावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर स्पष्टीकरण देत ठाम भूमिका मांडली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या काही भेटी, कार्यपद्धती आणि राजकीय भूमिकेबाबत विविध अफवा पसरवल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी अधिकृत पत्रकार परिषद घेतली.Dr. Neelam Gorhe
डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले की,” गेल्या चार दशकांपासून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांची कारकीर्द पारदर्शक आणि स्वच्छ राहिली आहे. आपल्या कार्यपद्धतीत कोणतीही गोष्ट लपवलेली नसून, जनतेसमोर सर्व काही स्पष्ट असल्याचा त्यांनी दावा केला.Dr. Neelam Gorhe
त्या पुढे म्हणाल्या, त्यांच्या कुटुंबातील संस्कारांमुळे त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा जपला आहे. कोणत्याही तथाकथित “गुरू” किंवा अंधश्रद्धांवर आधारित मार्गांचा अवलंब न करता त्यांनी आपली राजकीय वाटचाल केली आहे. “राजकीय पद किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक किंवा बुवाबाजीची मदत घेतलेली नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील एका हॉटेलमध्ये झालेल्या कथित भेटीबाबत त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार देत म्हटले की, “मी अशा प्रकारची कोणतीही भेट घेतलेली नाही. ही बातमी पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे.” त्यांनी या अफवांचा तीव्र निषेध करत संबंधित चर्चा आणि बातम्या खोट्या असल्याचे सांगितले.
राजकीय आयुष्यातील काही व्यक्तींना त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अस्वस्थता निर्माण झाल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान आणि विविध निर्णयप्रक्रियेत त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काहींमध्ये नाराजी आहे. विशेषतः काही राजकीय गटांकडून त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले की, “खोट्या प्रचाराला बळी न पडता मी माझे काम करत राहणार आहे. समाजहितासाठीची माझी गती यापुढेही अशीच कायम राहील.” त्यांनी अशा अफवांमागील शक्तींना कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.
Kharat! Deputy Speaker Dr. Neelam Gorhe’s explanation; “I will not fall prey to false propaganda”..
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर