Chief Minister : महाराष्ट्रात माओवाद जवळपास संपुष्टात, मुख्यमंत्र्यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Chief Minister महाराष्ट्रात माओवाद आता जवळपास संपुष्टात आला आहे. ही लढाई लढताना आमच्या २४४ पोलिसांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाची दखल घेत आणि हे कठीण काम करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी, ज्यांनी सी-६० फोर्समध्ये किमान ३ वर्षे सेवा बजावली आहे, त्या सर्वांना ‘सी-६० मेडल’ देऊन सन्मानित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी अभिमानाने नमूद केले.Chief Minister

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची ‘अर्धवार्षिक परिषद’ पार पडली. या परिषदेनंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “केंद्र सरकारने राज्यांच्या तांत्रिक प्रगतीसाठी १०६ मुद्दे दिले होते, ज्यांचे पालन करण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. आता आपण पुराव्यांच्या व्यवस्थापनासाठी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत, ज्यामुळे पुराव्यांमध्ये छेडछाड करणे अशक्य होईल. ही यंत्रणा सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सहा महिन्यांत कार्यान्वित करण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांना दिल्या आहेत.”Chief Minister

राज्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण (Conviction Rate) वाढवण्यासाठी सरकार आग्रही आहे. सद्यस्थितीत हा दर ५० टक्क्यांच्या आसपास असून तो ९५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी गेल्या ४ ते ५ वर्षांतील प्रकरणांचे ‘एआय’च्या माध्यमातून विश्लेषण करण्याचे काम सीआयडीला (CID) सोपवण्यात आले आहे. विशेषतः सेशन्स कोर्टातील निकालांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष रणनीती आखली जात आहे.

Maoism Nearly Eliminated in Maharashtra, Says Chief Minister

महत्वाच्या बातम्या