विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Mahajan अंजली दमानिया यांना तातडीने अटक करून त्यांना भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कोणी आणि कोणत्या अधिकारात दिले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.Prakash Mahajan
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांनी खरातला 117 वेळेस कॉल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 वेळा कॉल केल्याचा दावा केला आहे. हे कॉल नेमके कशासाठी करण्यात आले, असा सवाल दमानिया यांनी विचारला आहे.Prakash Mahajan
यावर प्रकाश महाजन म्हणाले, अंजली दमानिया यांना अटक करुन त्यांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची चौकशी करा. अंजली दमानिया स्वतःला काय पोलिस महासंचालक समजत आहेत का? त्यांना कॉल डिटेल्स कसे मिळतात? हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. उद्या एकनाथ शिंदे कुठे बाहेर गेले आणि त्यांची माहिती अशी बाहेर गेली तर त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना कॉल डिटेल्स मिळतात कसे? याची चौकशी करा.
अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आपला देश हा हिंदू धर्मियांचा देश आहे व देवी-देवतांना मानणारा देश आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भोंदू खरातच्या पोटात काय आहे हे थोडेच माहिती होते. त्यामुळे कोणी कोणासोबत फोटो काढला किंवा कुणाला कॉल केला त्याचा अर्थ असा होत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे हे बेशरमाचे लक्षण आहे व या ज्या काही दोन-तीन बाया (महिला) टिव टिव करतात. त्यांनी ते बंद केले पाहिजे विनाकारण त्यांनी राजकारण करू नये. त्या भोंदू बाबा ने जे काही केले असेल ते बाहेर काढले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
Who Leaked Call Records? Prakash Mahajan Demands Anjali Damania’s Arrest
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर