विशेष प्रतिनिधी
मुंबई : कैसे हराया?’ या विधानाने चर्चेत आलेल्या एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेखने निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली असून, आता तिच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, सहर शेखच्या वडिलांनी आरोप फेटाळून लावत दोन दिवसांत सगळे बाहेर काढणार, असा इशाराही दिला आहे. sahar sheikh
सहर शेख दोन दिवसांपासून नॉट रिचेबल का होता? असा प्रश्न पत्रकारांनी युनूस शेख यांना विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना युनूस शेख म्हणाले की, घरी चुलत्याचे निधन झाले होते. त्या गडबडीत आम्ही होतो. दुसरीकडे, मुंबई आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नगरसेविका सहर शेख उपस्थित होती. सहर शेखने इन्स्टाग्रामवर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना गेम ओव्हर…असे लिहिले आहे. तसेच तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कहानी बनी कितना तमाशा हुआ.. जाने तू कैसी होगी… असे गीत सहर शेखने व्हिडीओसोबत पोस्ट केले. सहर शेख वानखेडे स्टेडियमवर गेल्याबाबतही युनूस शेख यांना प्रश्न विचारण्यात आला.
यावर प्रतिक्रिया देताना युनूस शेख यांनी सांगितले की, मग काय झाले, कुठे जायचे नाही का, जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढचे पाऊल काय असेल, यावर युनूस शेख म्हणाले की, कायदा आणि प्रशासनावर आम्हाला विश्वास आहे. जे असेल, ते पुढील दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन सगळे सांगेन. आमच्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत. आम्ही खोटेपणा करणारी माणसे आहोत का, असा प्रतिप्रश्न करत सगळ्या गोष्टी बाहेर काढू, असे युनूस शेख यांनी स्पष्टपणे सांगितले.
ठाणे तहसीलदारांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने १८ मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचे कारण देत युनूस गैरहजर राहिले. मात्र, सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची रंगीत छायाप्रत व काही कागदपत्रे सादर केली. त्याच्या पडताळणीसाठी पुन्हा २३ मार्चला सुनावणी घेण्यात आली. यावेळी ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यामधील त्रुटी काढल्या, तर ठाण्याच्या रहिवासी असतानाही सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे.
अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळविलाठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्धीकी फरहा सबाब अहमद यांनी युनूस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना-१० लागू असताना नमुना-८ वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळविला. त्याआधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी केली होती.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी युनूस इकबाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना-८ वापरून व अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविला. त्यांची मुलगी सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले. ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षातून मुंब्र्यातील प्रभाग ३० मधून ती विजयी झाली.
father of corporator sahar sheikh amid threat to her position
महत्वाच्या बातम्या