Chitra Wagh : देवेंद्र फडणवीसांसोबत डिबेटवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप, चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांना टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chitra Wagh राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले असून, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः म्हटले आहे की ते त्यांच्या समकक्ष नेत्यांसोबतच डिबेट करण्यास तयार आहेत. त्यामुळे जर शरद यांनी विनंती केली आणि ते स्वतः डिबेटसाठी पुढे आले, तर मुख्यमंत्री त्यांच्यासोबत नक्कीच चर्चा करतील, असा टोला वाघ यांनी लगावला आहे.Chitra Wagh

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डिबेट करण्याची तयारी दर्शवल्याच्या पार्श्वभूमीवर वाघ म्हणाल्या बारामतीच्या ‘मोठ्या ताई’ सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री आधीच देऊन झाले आहेत.Chitra Wagh



महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या महिला खासदारांवरही वाघ यांनी टीका केली. इतक्या महिलांनी जे स्वप्न पाहिले होते, त्याचा चक्काचूर करण्याचे काम यांनी केले आहे. आणि त्यात महिला खासदार ज्या त्या ठिकाणी आहेत, त्यांचाही समावेश आहे, हे दुर्दैव आहे. जल्लोष केला गेला हे आणखी दुर्दैव आहे. मला त्यांना सांगायचे आहे की नक्की जल्लोष कराच तुम्ही, आता देशातल्या आणि राज्यातल्या महिलांचा शंखनाद तुम्हाला ऐकायला येईल, तो शंखनाद तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही.

कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील महिला विधेयकाला विरोध केला. त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, दुर्दैव आहे की ज्या महिलांनी, ज्या महिला खासदारांनी विरोध केला, या सगळ्या कुठल्या न कुठल्या राजकीय पार्श्वभूमीच्या महिला आहेत. कोणाचे वडील आहेत, कोणाचा पती आहे, कोणाचा भाऊ आहे. आज या 33 टक्क्यांची आवश्यकता होती, ज्यासाठी मोदीजींचा प्रयत्न आहे की सर्वसाधारण ज्यांच्या मागे कुठल्याही राजकारणाचा इतिहास भूगोल नाही, अशा महिला संसदेतही येणार होत्या आणि देशाच्या प्रत्येक विधानसभेतही येणार होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, संसदेत इतक्या सध्या सोप्या भाषेत हे बिल समजावले आहे, या बिलावर जे काही आक्षेप होते ते सुद्धा सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्याचे निरासण करण्यात आले आहे. असे असून सुद्धा जर सभागृहात बसलेल्या महिला प्रश्न विचारात असतील तर मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्यावरच आहे.

War of words over debate with Devendra Fadnavis, Chitra Wagh targets Supriya Sule

महत्वाच्या बातम्या