विशेष प्रतिनिधी
मुंबई: Girish Mahajan महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ आज वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. “लोकांना वेठीस धरून रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बाजूच्या मैदानात जा,” अशा शब्दांत या महिलेने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याने मोर्च्याच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.Girish Mahajan
महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ आज वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चात एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. “लोकांना वेठीस धरून रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बाजूच्या मैदानात जा,” अशा शब्दांत या महिलेने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याने मोर्च्याच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मोर्चामुळे दुपारच्या सुमारास वरळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दुपारी १ च्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक हैराण झाले होते.Girish Mahajan
याच कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला. ती आपल्या कारमधून खाली उतरली आणि थेट मोर्चाच्या ठिकाणी पोहोचली. तिथे उपस्थित महिलांना आणि पोलिसांना जाब विचारत तिने गोंधळ घातला. “एका तासापासून मी इथे अडकले आहे. लोकांच्या कामाला आणि मुलांच्या शाळेला अडथळा निर्माण करून हे कसले आंदोलन?” असा सवाल करत तिने आंदोलनकर्त्यांना सुनावले.
या मोर्चामध्ये भाजपचे संकटमोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे सहभागी झाल्या होत्या. संबंधित महिलेने थेट त्यांच्यासमोर जाऊन वाहतूक कोंडीचा पाढा वाचला. “आम्हाला त्रास देऊ नका, आंदोलन करायचे असेल तर मैदानात करा.” महिलेने सांगूनही कुणी ऐकत नसल्याचे पाहून ‘तुम्हाला समजत नाहीये का?’ असा सवाल गिरीश महाजन यांना केला. यावेळी तिने पोलिसांनाही रस्ता रिकामा करण्यासाठी धारेवर धरले. पोलिसांना परिस्थिती हाताळताना मोठी कसरत करावी लागली.
Woman stuck in massive traffic jam during jan aakrosh rally slams Girish Mahajan
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातून शिंदे गटाचा विधान परिषदेचा उमेदवार कोण; अंतिम क्षणी नवा चेहरा येणार?
- सोशल मीडियावरील पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दोन वाहतूक पोलीस निलंबित
- २,००० कोटींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा मार्ग मोकळा; प्रशांत वाघमारेंना सुप्रीम कोर्टाचा दणका!
- शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल