विशेष प्रतिनिधी
पुणे:एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही स्पष्टता नसल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून, पक्षप्रमुख स्वतः रिंगणात उतरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. जर त्यांनी उमेदवारी स्वीकारली, तर महाविकास आघाडी कडून त्यांना एकमुखी पाठिंबा मिळाला आहे. निवडणूक बिनविरोध होण्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, त्यांच्या अनिश्चित भूमिकेमुळे पक्षात पर्यायी नावांची चाचपणी देखील केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या जागांसाठी काही महत्त्वाची नावे पुढे येत आहेत. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे या शर्यतीत सर्वात आघाडीवर असल्याचे मानले जाते. नुकतेच त्यांचा कार्यकाळ संपला असून, त्यांनी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेत सरकारवर सातत्याने टीका केली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर पक्षाच्या आक्रमक प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे नावही चर्चेत आहे. ड्रग्ज प्रकरण, महिला अत्याचार यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर त्यांनी राज्य सरकारला घेरल्यामुळे पक्षांतर्गत त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांची उमेदवारीही तितकीच मजबूत मानली जात आहे.
याशिवाय, कोकणातील नेते वैभव नाईक, माजी खासदार राजन विचारे आणि विनायक राऊत यांची नावेही चर्चेत आहेत. पक्षाचे सचिव सूरज चव्हाण यांचाही पर्याय म्हणून विचार केला जात असल्याचे सांगितले जाते.
Confusion over Uddhav Thackeray’s candidature; Discussion of alternative names within the Thackeray group…
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल