विशेष प्रतिनिधी
मुंबई: MP Sanjay Jadhav मातोश्री’वर आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव यांनी गैरहजेरी लावल्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षंतराच्या चर्चांना आता अधिक उधाण आले आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.MP Sanjay Jadhav
उद्धव ठाकरे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली होती. या बैठकीला अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते. मात्र खासदारच अनुपस्थित राहिले.MP Sanjay Jadhav
विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर आणि महाविकास आघाडीच्या दारूण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटातील गळतीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. निवडणुकीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली असतानाच, आता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.MP Sanjay Jadhav
चार दिवसांपूर्वीच परभणीच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत संजय जाधव यांनी आपली अस्वस्थता शिवसैनिकांसमोर बोलून दाखवली होती, त्यामुळे या सलग अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाचे कोणते नेते व पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात आहेत? याची खमंग चर्चा रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, आम्हाला काही सूचना किंवा आम्ही ऑपरेशन टायगर राबवतोय असा कोणताही भाग नाही. पण ज्या दिवशी हे ऑपरेशन टायगर करायचे आहे, ते असे सांगून केले जात नाही. आमच्या संपर्कात सर्वजण आहेत. आमच्या संपर्कात कुणीही नाही हे आम्ही नाकारत नाही. परंतु योग्य निर्णय केव्हा घ्यायचा, हा सर्व भाग जो आहे तो एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा भूकंप निश्चितपणे होईल.
MP Sanjay Jadhav likely to quit thackeray camp
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल