विशेष प्रतिनिधी
मुंबई: Devendra Fadnavis “मोदी है तो मुमकिन है,” या घोषवाक्याचा पुनरुच्चार करत देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देताना हा जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे म्हटले.Devendra Fadnavis
पश्चिम बंगालच्या निकालावर बोलताना फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “भाजप हा बाहेरचा पक्ष आहे” हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. “भारतीय जनता पक्षाची निर्मिती करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालचेच होते. त्यामुळे खरा बंगालचा पक्ष कोणता असेल, तर तो भाजपच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.Devendra Fadnavis
ते पुढे म्हणाले की, बंगालच्या जनतेने केवळ परिवर्तन नाही तर “महापरिवर्तन” घडवून आणले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने हा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी काँग्रेस, कम्युनिस्ट आणि ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका करत म्हटले की, “३० वर्षे काँग्रेस, ३६ वर्षे कम्युनिस्ट आणि १५ वर्षे तृणमूलच्या सत्तेमुळे बंगालची अवस्था बिकट झाली. एकेकाळी आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेला बंगाल गुंतवणुकीत मागे पडला.”
ते म्हणाले की, हा विजय केवळ राजकीय नाही तर देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. “बंगालमधील विजयामुळे घुसखोरी आणि हल्ल्यांवर नियंत्रण मिळवता येईल,” असा दावा त्यांनी केला.
भाजप कार्यकर्त्यांनी मोठे बलिदान दिल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, “अत्याचार सहन करूनही कार्यकर्ते थांबले नाहीत. हा विजय त्यांच्या संघर्षाचे फलित आहे.”
आसाममध्येही भाजपचा प्रभाव
आसाममध्ये भाजप सरकार आल्यानंतर दहशतवादी कारवाया कमी झाल्या असून पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे बंगालच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Modi hai to mumkin hai; BJP is Bengal’s true party after massive change, says Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा