विशेष प्रतिनिधी
मुंबई : SRPF recruitment महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) गट क्रमांक 5, दौंड अंतर्गत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून 100 पैकी 85 प्रश्न जसेच्या तसे विचारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी विरोधकांनी चौकशीची मागणी करत सरकारवर जोरदार टीका केली होती. यानंतर अप्पर पोलीस महासंचालक यांनी पत्रक काढत ही भरती स्थगित करत असल्याची घोषणा केली. तसेच पोलीस उपमहानिरीक्षक, पुणे यांनी संबंधित प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.SRPF recruitment
शनिवार 2 मे रोजी एसआरपीएफ गट क्रमांक 5 ची 100 गुणांची लेखी परीक्षा झाली. ही परीक्षा इंदापुरातील एका महाविद्यालयात झाली. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण होता, असे एकूण 100 प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. त्याच 100 प्रश्नांची क्रमवारी मागे-पुढे करून ए, बी, सी आणि डी असे प्रश्नसंच होते. या परीक्षेतील चारही प्रश्नपत्रिकेत 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून उचलण्यात आले होते. हा प्रकार समोर येताच परीक्षार्थींमध्ये खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या गोंधळावरुन राज्य सरकारवर टीका केली. यानंतर ही परीक्षा स्थगित करण्याचे आदेश काढण्यात आले.SRPF recruitment
आदेशात म्हटल्यानुसार, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 5, दौंड यांचे अधिपत्याखालील सन 2024-25 सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा दिनांक 02/05/2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 5, दौंड यांनी घेतलेल्या लेखी परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत 100 पैकी 85 प्रश्न हे महाराष्ट्र पब्लिकेशन पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच 10 यामधील असल्याबाबतच्या तक्रारी माध्यमांद्वारे प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, म.रा., पुणे यांच्यामार्फत दिनांक 04/05/2026 पासून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 5, दौंड यांची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. सदर चौकशी अहवाल प्राप्त होताच पुढील योग्य कार्यवाही करण्यात येईल..
SRPF recruitment exam postponed; 85 questions found from private publication set
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा